सेवायोजन नोंदणी कार्डला आधार कार्ड 31 ऑगस्ट पर्यंत लिंक करावे अन्यथा नोंदणी रद्द होणार

 


सेवायोजन नोंदणी कार्डला आधार कार्ड

31 ऑगस्ट  पर्यंत लिंक करावे अन्यथा नोंदणी रद्द होणार



लातूर,दि.20(जिमाका):-  महाराष्ट्र शासनाच्या पुर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व सध्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी एम्लॉयमेंट नोंदणी कार्डसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. 

जिल्हयातील सर्व नोकरी इच्छूक उमेदवार, कौशल्य विकास प्रशिक्षण घेवू इच्छीणारे उमेदवार तसेच या वेबपोर्टलवर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्याप पर्यंत आपले आधार कार्ड एम्लॉयमेंट कार्डशी लिंक केलेले नाही. त्यांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करुन घ्यावी. याकरीता उमेदवारांनी  https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Employment ::::> Job Seeker (Find a Job) ::::> Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन Login वर क्लीक करावे. आपल्या समोर दिसणाऱ्या आधार व्हेरीफिकेशन विंडो मध्ये सर्व माहिती भरुन आपली नोंदणी अद्यावत करता येईल.

जिल्हयातील संबंधित उमेदवारांनी आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट (अद्यावत) न केल्यास आपली नोंदणी  31 ऑगस्ट,2020 नंतर रद्द होईल. नोंदणी अद्यावत करण्याचे आवाहन प्र.सहायक आयुक्त रा.नि. वाकुडे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, क्रिडा संकूल समोर, औसा रोड, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या