लातूर महानगरपालिकेच्या नवीन आयुक्त दीपा मुधोळ मुंडे.
लातूरचे भूमिपुत्र कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी.
लातुर : उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांची लातूरला महानगरपालिके च्या आयुक्त म्हणून बदली झाली आहे तर उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपा मुधोळ - मुंडे यांनी कोरोना संसर्ग काळात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत प्रभावी पणे काम केलेले आहे. तब्बल ३७ दिवस उस्मानाबाद ग्रीन झोन मध्ये होते. त्यांची आता लातूरला महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्या निश्चितच आपल्या कार्याचा ठसा लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून उठवतील.
उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे लातूरचे भूमिपुत्र आहेत. दिवेगावकर यांनी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही काम केलेले आहे. त्यांच्या कार्यकाळाची आजही लातूरकर आठवण काढत असतात. यापूर्वी कौस्तुभ दिवेगावकर हे पुण्याला भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते.
- व्यंकट पनाळे, मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८
https://youtu.be/l0hMvnTWvXE
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.