अहिल्याबाई होळकर यांचे जीवन प्रेरणादायी-जी.बी.डोलारे
औसा मुख्तार मणियार
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सलग २८ वर्षांचा आदर्श राजकारभार शिक्षण स्वावलंबन संघटन स्वाभिमान आणि प्रंसगी संघर्ष या पंचसूत्री संदेशातुन त्यांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी धर्मपरायण आणि न्याय त्यांच्या बळावर संकटावर मात करीत त्यांने तोंड दिले त्यांचे जीवन कार्य म्हणजे मानव जातीसाठी एक प्रेरणा आहे.अहिल्यादेवी होळकर यांनी लोक उपयोगी कामातून आपले कर्तव्य निर्माण केले. त्यांचे जीवन संकटमध्ये असतानाही त्यांनी सचोटिने राज्यकारभार करीत इतिहास निर्माण केला असून त्यांचा इतिहास आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन जी.बी.डोलारे.गुरूजी यांनी केले आहे.औसा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा कोपरे हे होते. यावेळी किशन भोसले,राम कांबळे,प्रकाश कांबळे, हरिदास गाडेकर,विश्वनाथ कांबळे, सुर्यभान कांबळे आदिची उपस्थिती होती औसा येथील अहिल्यादेवी होळकर संस्कृति सभागृह येथील आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री तुकाराम कांबळे धोंडीराम राम कांबळे, महादेव कांबळे, महेश कांबळे,ज्ञानेश्वर कांबळे, अर्जुन गाडेकर आदिनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.