पत्रकार मारहाण प्रकरणी संबंधितावर योग्य ती कारवाई करू - पालकमंत्री ना. अमित देशमुख

 

पत्रकार मारहाण प्रकरणी संबंधितावर योग्य ती कारवाई करू - पालकमंत्री ना. अमित देशमुख



लातूर:  कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये लातूर जिल्ह्यातील पत्रकारावर पोलिसाकडून अपमानास्पद वागणूक व  मारहाण प्रकरणी संबंधितावर योग्य ती कार्यवाही केली जाईल ,असे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी पत्रकारांना आश्वासन दिले आहे.
    लॉकडाऊनच्या काळामध्ये लातूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांना लातूर शहर पोलीस डिवायएसपी सचिन सांगळे यांच्याकडून काठीने  मारहाण व दूरदर्शन चॅनलचे दीपकरत्न निलंगेकर यांना अपमानास्पद वागणूक तसेच  शहरातील इतर पत्रकारांनाही एकेरी शब्दात बोलणे हे उदाहरण ताजे असताना 1 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे यांना अर्वाच्च भाषेत बोलणे, त्यांच्यावर हात उगारणे व एकाद्या गुंड माणसासारखे पोलीस गाडीत डांबून शहरभर मिरवणे असे प्रकार सचिन सांगळे यांनी जाणून बुजून केले असल्याचे निवेदन पालकमंत्री ना.अमित देशमुख यांना एका निवेदनाद्वारे पत्रकार बांधवांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन दिले. 
    औसा, निलंगा,उदगीर, अहमदपूर या तालुक्यातही पत्रकारावर वारंवार पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक व मारहाण झाल्याचे पालकमंत्री ना.अमित देशमुख यांना निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.
   लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारावर पोलिसांकडून वारंवार मारहाण होणे व अपमानास्पद वागणूक होणे हे चुकीचे असून यासंबंधी आपण तात्काळ अहवाल मागवून घेऊ व संबंधित अधिकाऱ्यावर  कडक कार्यवाही करू,असे आश्वासन यावेळी ना.अमित देशमुख यांनी पत्रकारांना दिले आहे.
    शेवटी या निवेदनावर लातूर शहर डीवायएसपी सचिन सांगळे यांना निलंबित करावे व पत्रकारांना न्याय द्यावा,असे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर पत्रकार रघुनाथ बनसोडे,अशोक देडे, नरसिंह घोणे,लिंबराज पन्हाळकर, बालाजी वागलगावे, दीपरत्न निलंगेकर, अशोक हनवते, ज्ञानेश्वर सागावे, संगम कोटलवार, विष्णू अष्टेकर,दिगंबर तारे,महादेव डोंबे ,अरुण कांबळे आदी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या