जिल्हाधिकारी कार्यालयात गेला मेंढरांचा मोर्चा । कर्मचाऱ्यांना सोडाव्या लागल्या मेंढरा साठी खुर्च्या ।। मेंढर घुसली जिल्हाधिकारी कार्यालयाचे मैदानात.

 जिल्हाधिकारी कार्यालयात गेला मेंढरांचा मोर्चा । 

कर्मचाऱ्यांना सोडाव्या लागल्या मेंढरा साठी खुर्च्या ।। 


मेंढर घुसली जिल्हाधिकारी कार्यालयाचे मैदानात. 







( व्यंकटराव पनाळे, जिल्हा प्रतिनिधी )

लातुर : दि. २८ - आज शुक्रवार रोजी दुपारी एक ते दोन च्या दरम्यान लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे बार्शी रोडवरील मुख्य प्रवेशद्वारातून शेकडो मेंढर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानात घुसली. जिल्हाधिकारी कार्यालयावर आज अचानक पणे मेंढरांचा मोर्चा गेला होता. या मेंढरांच्या मोर्चाला रोखण्यासाठी आणि मेंढरं मैदानाच्या बाहेर घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या खुर्च्या सोडून मैदानात यावे लागले. मुके बिचारी मेंढरं जणु काही आमच्या चारा-पाण्याची सोय करा नाही तर खुर्च्या खाली करा ! अशीच मागणी ते करत असावेत. मैदानातल्या चाऱ्यावर मेंढरानी ताव मारला. मेंढपाळ बिचारे मैदानात बाजुला थांबून होते. मेंढरांना चांगला चारा मिळाल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. परंतु अखेर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आपल्या खुर्च्या खाली कराव्या लागल्या आणि मैदानात येऊन मोर्चेकऱ्यांना सामोरे जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी काही कर्मचारी आणि एक पोलिस कर्मचारी येऊन मेंढ्यांचे आणि मेंढपाळांचे जणू काही जिल्हाधिकारी यांच्यावतीने येऊन निवेदनच स्वीकारले. आणि नंतर सर्व मेंढ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानातून बाहेर घालवले. मेंढरं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानाचे बाहेर गेल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी मेंढरांचा मोर्चा शांततामय मार्गाने  परत पाठवल्याचा आनंद व्यक्त केला.  


- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार 

   ९४२२०७२९४८





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या