औशातून बससेवा टप्प्या टप्प्याने सुरू

 औशातून बससेवा टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात आली




औसा मुख्तार मणियार

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च पासून बंद असलेली बससेवा टप्प्या टप्प्याने सुरू झाली आहे.ग्रामिण भागातील प्रवाशांकडून आता बससेवेला प्रतिसाद मिळत आहे.बुधवारी २ हजार २७९ प्रवाशांनी बसने प्रवास केला.औसा आगाराच्या एकूण ८३ हजार ३६० रूपयांचे उत्पन्न मिळाले दिवसभरात शहरासह तालुक्यातील वेगवेगळ्या मार्गावर बस धावली.१२ बसेसच्या एकूण ९४ बसफे-या झाल्या.या सेवेला प्रवाशातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.टप्या टप्प्याने बससेवा पूर्वपदावर येत आहे ‌औसा आगारातून सध्या सोलापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, किनगाव, मुरुड,सेलू या मार्गावर बसेस सुरू करण्यात आली आहेत.एका बसमध्ये किमान २२ प्रवासी संख्या, निर्धारित करण्यात आली आहे.कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर महामंडळाकडून प्रवाशांची काळजी घेतली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या