जे ई ई निट परिक्षा रद्द करा जिल्हा व शहर कॉंग्रेस चे मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने जिल्हधिकारी याना दिले निवेदन

 जे ई ई  निट परिक्षा रद्द करा जिल्हा व शहर   कॉंग्रेस चे मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने


जिल्हधिकारी याना दिले निवेदन 






लातूर, दि,28,


कोवीड -१९ साथ रोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत JEE/NEET या परीक्षा घेणे योग्य ठरत नाही. या परीक्षांना उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर असंख्य अडचणी आहेत. विधार्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. 


अशा गंभीर परिस्थितीतही केंद्रातील मोदी सरकार या परीक्षा घेण्यावर ठाम आहे त्यामुळे आज शुक्रवार दिनांक २८ आॅगस्ट २०२० रोजी केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात लातूर येथे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली आणि या परीक्षा रद्द कराव्यात असे निवेदन मा. जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.


याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.किरण जाधव, लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, अभय साळूंके, लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुनिताताई आरळीकर,   अल्पसंख्यांक लातूर शहर जिल्हाध्यक्ष फारूक शेख, लातूर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष बिरबल देवकते, शहर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष सुपर्ण जगताप, लातूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मोहन सुरवसे, संभाजी सूळ, प्रभाकर बंडगर, रेणापूर बाजार समिती चे सभापती रमेश सूर्यवंशी, प्रवीण पाटील, सिकंदर पटेल,NSUI चे शरद देशमुख , सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, मीनाक्षी शेटे, रघुनाथ शिंदे, अनुसूचित जाती सेल प्रमुख सचिन गंगावणे, ज्ञानेश्वर सागावे, अॅड.प्रदीपसिंह गंगणे, तरबेज तांबोळी, अभिषेक पतंगे, प्रवीण कांबळे, अॅड. देविदास बोरुळे पाटील , ऍड. दीपक बोरगावकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या