मोहर्रम.... त्याग, बलिदानाचा व दडपशाही विरुद्धच्या लढ्याचा इतिहास
मज़हर पटेल अलमलेकर
प्राचार्य जुलेखा उर्दू डी एड कालेज अफ़सर नगर औसा
मुहर्रम इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे.केवळ हिजरी कॅलेंडरचा नाही तर हिजरीच्या आधी नव्हे तर रसूलुल्लाह (स.अ.) च्या आधी अरब जगात दोन कॅलेंडर्स होते. एक अमूलफिल (अब्राहमचे मक्कावरील आक्रमण) आणि दुसरे इसवी. या दोन कॅलेंडरचा पहिला महिना मुहर्रम हाच मानला जायचा . इस्लामिक कॅलेंडरला "हिजरी कॅलेंडर" म्हणतात. जेव्हा हजरत मुहम्मद (स.अ.) मक्का सोडले आणि मदीनाला गेले तेव्हा या घटनेस हिजरत असे म्हणतात. हिजरी हा शब्द 'हिजरातून' आला आहे. 'हिजरा' ही एक इस्लामी शब्दावली आहे. सत्याच्या किंवा इमानच्या रक्षणासाठी किंवा इस्लामच्या प्रसारासाठी हिजरत म्हणजे एखाद्याचा स्वतःच्या जन्मभूमीचा त्याग.
इस्लामी विश्वाचे दुसरे खलीफा हजरत उमर रजी. किंवा अमीरुल मोमीनिन यांच्या वेळेपासून हिजरी दिनदर्शिका सुरु झाली . या कॅलेंडरची आवश्यकता अशा प्रकारे उद्भवली की जेव्हा हजरत उमर रजी. हजरत अबू मुसा अशारी रजी. यांना येमेनचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले तेव्हा त्यांना खलीफा ओमर यांचे संदेश प्राप्त होत असत परंतु त्यांच्याकडे त्यावर तारीखेचा उल्लेख नव्हता. यामुळे बर्याच अडचणी आल्या. खलिफाकडून आलेली पहिली आज्ञा कोणती? व नंतर कोणती होती? हे राज्यपाल यांना कळत नव्हते.
अबू मुसा अल-अशारी रजि. यांनी खलिफा उमरचे रजि. याकडे लक्ष वेधले, म्हणून त्यांनी सल्लामसलत केली आणि मग 'मजलिस-ए-शूरा' मध्ये विविध पैलूंचा विचार केला गेला. हजरत अली रजी. यांनी पैगंबर स.स. हिजरतचा दाखला देऊन जो कि सर्वांनी मान्य केला होता तेव्हापासून इस्लामी वर्षाची सुरवात करण्याचे सुचवले सर्वांनी मिळून ते मान्य केले. म्हणूनच त्याला हिजरी सन असे म्हणतात. हुजूर (स.अ.) यांनी 8 रबीउल-अव्वल रोजी हिजरातचा आदेश दिला होता परंतु अरबमध्ये मुहर्रमपासून नवीन वर्ष सुरू होत असे. म्हणूनच हिजरी वर्ष 2 महिने 8 दिवसापूर्वी स्थापित केले गेले. हिजरी ही चंद्र दिनदर्शिका आहे आणि यात 354 किंवा 355 दिवस आहेत. आणि अशा प्रकारे 1 मुहर्रम 1 हिजरी म्हणजे 16 जुलै 622 इसवी सनला हिजरी वर्षाची सुरुवात मानली जात असे. हिजरीच्या 16 वर्षांनंतर, इ.स. 638 मध्ये, हजरत उमर यांच्या कार्यकाळात हिजरी कॅलेंडर सुरू करण्यात आले आणि "हिजरी" या इस्लामिक कॅलेंडरची ओळख झाली. आज जसे इस्लामिक नववर्ष 1442 आहे, त्याचा अर्थ असा आहे की प्रेषितच्या स्थलांतरानंतर बरीच वर्षे गेली आहेत.
कमरीची तारीख (चंद्राची तारीख) लक्षात ठेवणे म्हणजे 'फर्ज-ए-किफया' (म्हणजे काही लोकांना लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि ज्याला ते आठवते त्याचे प्रतिफळ मिळेल) कारण हि तारीख रमजानचे उपवास, शब-ए-कदर, ईद, हज, जकात यांचा आधार आहे चंद्राच्या तारीखे दिनदर्शिकेतूनच दिले पाहिजे कारण अल्लाहने कुराणात चंद्राला 'मावाकित उल निन्नास' (माणसांचे टाईम टेबल / कॅलेंडर) म्हटले आहे. कॅलेंडर ही एका संस्कृतीची ओळख आहे.
हिजरतची घटना जागतिक महापरिवर्तनाचा दिवस आहे.अंतिम पैगंबरांपूर्वी या जगात 'यथा राजा तथा प्रजा' ही शासन व्यवस्था होती.न धर्माचे स्वातंत्र्य न व्यक्ती स्वातंत्र्य कोणाला होते. 1 मुहर्रम ला आदरणीय अंतिम पैगंबर मुहम्मद (सा) आणि त्यांच्या मूठभर सहकाऱ्यानी सत्यासाठी हिजरत करून न्याय,समता आणि बंधूत्वावर आधारित सत्तेचा पाया मदीना शहरात रचला आणि मग हे शोषीत शासनकर्ते बनल्यावर अरबस्तानातील एक एक 'यथा राजा तथा प्रजा' नियम व्यस्थेचे कंबरडे मोडायला सुरवात केली.पूर्ण अरब न्यायाखाली आल्यावर ते तेथेच थांबले नाही.ते अनोळखी भाषा,प्रांत,देश येत नाही याची जराही पर्वा न करता न्याय स्थापनेसाठी जगभरात पसरले आणि रोमन व पर्शियन सारख्या पृथ्वीतळावर देव बनून बसलेल्या अत्याचारींचे साम्राज्य नमवून सोडले.अनेक अशा राज्यातुन शुद्रांना,शोषीतांना मुक्त करून तिथेही न्याय स्थापना केली..
याच महिन्यात पैगंबराचे नातू हुसैन रजि. यांनी दडपशाहीविरुद्ध, आतंकवादाविरुद्ध लढा देऊन शहीद झाले. जगाला शस्त्राच्या विरुद्ध शांततेचा मार्ग दाखवला
ज्यात त्या संस्कृतीचा इतिहास तारखेशी जोडलेला आहे.
इस्लाम धर्मातील पाचवे खलिफा असलेल्या अमीर मुआविया यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर त्या पदासाठी त्यांचा मुलगा यजिदला उत्तराधिकारी म्हणून त्यांनी नियुक्त केले होते. या नियुक्तीला इस्लाम धर्मियांचा विरोध होता. कारण त्यावेळी यजिदची ओळख ही गुंड म्हणून होती. पैगंबरांचे नातू असलेल्या इमाम हुसैन यांनी देखील विरोध केला होता. त्याच्यामुळेच युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर हे युद्ध बगदादमधील करबलामध्ये झाले.
या युद्धात हसेन आणि हुसेन यांच्या बाजूने त्यांचे सोबती 72 जण होते. यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. तर तिकडे यजिद मुआविया याचे 40 हजार सैनिक होते. या यजिदाचा सामना करताना हुसैन रजि. इ.स. 680 मध्ये मोहरमच्या दहाव्या दिवशी हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू करबला येथे शहीद झाले होते. . ज्या दिवशी ते शहीद झाले त्या दिवसाला ‘यौमे आशुरा’ असे म्हणतात. इमाम हुसैन यांचा लढा समानतेसाठी, सत्यासाठी होता. हा लढा हुकूमशाही विरुद्ध होता. इस्लामी जगताला पैगंबर स.स. यांनी दिलेल्या तत्वनिष्ठ विचारांची पुनरावृत्ती होता, इस्लाम मध्ये व्यक्तिनिष्ठता महत्वाची नसून इस्लाममध्ये तत्वनिष्ठता महत्वाची आहे. जी एका ईश्वराप्रती-अल्लाहप्रति आणि त्यांच्या पैगंबराच्या विचाराशी तत्वनिष्ठता बाळगते. महात्मा गांधीजी "इमाम हुसैन यांच्या या लढ्यातून इस्लाम हा तलवारीच्या जोरावर पसरला नसून कुर्बानी-त्याग यांच्या जोरावर जगात पोहचला हे प्रतीत होते." असे म्हंटले होते. तत्वे हि स्वतःचे बलिदान देऊन कायम राहतात हे या लढ्यातून प्रतीत होते. तैमूरलंगच्या कार्यकाळात भारतीय उपखंडात मोहर्रमच्या दिवशी अनेक अनिष्ट प्रथा सुरु झाल्या ज्यांचा इस्लामशी संबंध नाही.
तसेच इस्लामचे एक पैगंबर हजरत मुसा अलै. यांच्यावेळी फिरऔनचा शेवट करून अन्यायापासून मुक्तता करण्याचे काम अल्लाहने या मोहर्रमच्या महिन्यात केल्याने यहुदी लोकही 10 व्या मोहर्रमला उपवास ठेवतात. हजरत आदम अलैही. यांना निर्माण केल्याचा दिवस, अंतीम निवाड्याच्या दिवसाविषयी एक ओळख, हजरत इब्राहिम अलैही. यांच्या जन्माचा दिवस म्हणून देखील मोहर्रम ची ओळख सांगता येते.
क़त्ल ए हुसैन अस्ल में मर्ग ए यज़ीद है ।
इस्लाम ज़िंदा होता है हर कर्बला के बाद ।।
Kहिजरी कॅलेंडर ही मुस्लिमांची ओळख आहे. म्हणूनच, त्यास प्रोत्साहित करणे आणि येणाऱ्या पिढ्यांना त्याची पार्श्वभूमी आणि तिथली धार्मिक आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा जाणून घेण्याचे मुस्लिमांचे कर्तव्य आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.