अवैध सावकारीबददलची तक्रार उपनिबंधक सहकारी संस्था (डी.डी.आर) लातूर यांनी फेटाळली

 

अवैध सावकारीबददलची तक्रार उपनिबंधक सहकारी संस्था (डी.डी.आर) लातूर यांनी फेटाळली 





 लातूर-या प्रकरणातील अर्जदार/वादी श्री. दतात्रय वसंत साळुंके यांनी दिनांक 26/09/2017 रोजी त्यांची वडीलोपार्जित मालकीची मौजे बोरफळ ता. औसा येथील जमीन गट नंबर 604 मधील क्षेत्र 25 आर ही जमीन अर्जदारांच्या वडीलांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाकरिता  पैशाची आवश्यकता असल्याने त्यांच्या गावातील खाजगी सावकार रामदास फरताडे यांच्याकडे रक्कमेची मागणी केली.त्यानंतर सदरील रामदास फरताडे यांनी रूपये 62000 रूपये कर्जाऊ दिले व वादग्रस्त जमीनीचे विश्‍वासु बयनामा कर्जाऊ रक्कमेच्या हमीपोटी सावकार रामदास फरताडे यांचे हक्कात करून दिला. त्यानंतर 2/08/2017 रोजी अर्जदार गावातील सावकार  रामदास फरताडे यांच्या कडे गेला व कर्जाऊ रक्कम परत घ्या व जमीनीचे खरेदीखत करून जमीन दया  अशी विनंती केली. परंतु सदर  विनंती रामदास फरताडे यांनी ऐकली नाही व ती जमीन गावातील दतात्रय श्रीमंत  सांळुके यास विक्री केली अशी तक्रार रामदास फरताडे व दतात्रय श्रीमंत  सांळुके यांच्या विरूध्द खाजगी सावकारी प्रतिबंधीत कायदयातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था औसा यांच्याकडे दिली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी रामदास फरताडे व  दुसरा खरेदीदार दतात्रय श्रीमंत सांळुके यांचे घरांची झाडाझडती घेण्यात आली. ज्यामध्ये रामदास फरताडे यांच्या घरी कोणताही दस्ताऐवज मिळुन आला नाही परंतु दतात्रय श्रीमंत सांळुके यांच्या घरी या जमीनीच्या व्यवहारासंबंधीची करारनामा, इतर जमीनीचे खरेदीखत व तत्सम कागदपत्रे मिळुन आल्यानंतर सदरील प्रकरणाचा अहवाल त्यांनी उपनिबंधक सहकारी संस्था (डी.डी.आर) लातूर यांच्या कडे पाठविला. 
सदरील प्रकरणातील अर्जदार व गैरअर्जदार यांना हजर होऊन या प्रकरणाशी संबंधीत पुरावे व म्हणणे दाखल करून घेवून लेखी युक्तीवाद दाखल करून घेवून अर्जदाराचे वतीने दिलेली तक्रार व त्यास अनुसरून दिलेले शपथपत्र व इतर कागदपत्रे यांची शहनिशा करून तक्रारदाराने मांडलेले मुददे व वास्तविक  मुददे यांचा विचार करता उपनिबंधक सहकारी संस्था( डी.डी.आर) लातूर यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम2014 चे कलम 18( 2) नुसारच्या अधिकाराचा वापर करून अर्जदाराचे वडीलांनी  गैरअर्जदार यांना अवैध सावकारी अंतर्गत वादग्रस्त जमीनीचे गहाणखत करून दिलेले आहे हे सिध्द करू न शकल्याने अर्जदार वसंत साळुंके यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. सदरील प्रकरणात गैरअर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. आर डी काळे यांनी वकील म्हणुन काम पाहीले.  
     
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या