पॉलिटेक्निकच्या गुणवत्तेतही लातूर पॅटर्न निर्माण करावा
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.06/08/2020
स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निकच्या माध्यमातून कायम गुणवत्ता जोपासण्याचे काम केले जात आहे. गेल्या सहा वर्षापासून या कॉलेजचा 100 टक्के निकला लागला असून या कॉलेजचे विद्यार्थी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर यश संपादन करीत आहेत. त्यामुळे यापुढील कालावधीतही गुणवत्तेची पताका कायम ठेवून पॉलिटेक्निकच्या गुणवत्तेतही नवा लातूर पॅटर्न निर्माण करावा, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जे.एसपी.एम.लातूर द्वारा संचलित स्वामी विवेदकानंद इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक, लातूर येथे दि.5 ऑगस्ट 2020 रोजी बुधवारी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईद्वारे आयोजित केलेल्या उन्हाळी परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ऑनलाईन गुणवंताच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्यकारी संचालक तथा मनपा सदस्य अजित पाटील कव्हेकर हे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे समन्वयक विनोद जाधव, संचालक आप्पासाहेब जाधव, प्राचार्य राजकुमार साखरे, उप-प्राचार्य प्रवीण मोरे आदी मान्यवर उपस्थित हेाते.
यावेळी जिल्ह्यामधून प्रथम येण्याचा बहुमान दीपक राठोड याने मिळविला. तर जिल्ह्यामधून द्वितीय क्रमांक संयुक्तिक रित्या पठाण सना शेरखान, र्हाळंबे वैष्णवी संजय, सय्यद शिफा यांनी मिळविला. या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी शब्दसुमनांनी स्वागत केले. यावेळी पुढे बोलताना कव्हेकर म्हणाले की, पॉलिटेक्निक कॉलेजच्या यशाचे गमक हे येथे विद्यार्थ्यांना मिळणार्या सर्व सोयी-सुविधा, भव्य इमारत, वाय-फाय कॅम्पस, सुसज्ज ग्रंथालय, अनुभवी प्राध्यापक वृंद, परदेशातील अनुभवी व्यक्तींचे व्ही.डी.ओ.कॉन्फरसिंगच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच सर्वगुणसंपन्न व जबाबदार नागरिक घडविण्यासाठी संस्था कटिबध्द आहे. असेही ते म्हणाले
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आदमिले सर यांनी केले तर आभार जगदिश सोमवंशी यांनी मानले. यावेळी या ऑनलाईन गुणवंताच्या सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
तंत्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी कौशल्यावर भर द्यावा- अजितसिंह पाटील कव्हेकर
आज आपण उद्योग जगतामध्ये पाहतो की, तंत्रशिक्षण घेणार्या व्यावसायीक विद्यार्थ्यांमध्ये प्रॅक्टिकल कौशल्याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेअरी अभ्यासासोबतच प्रात्याक्षिक कौशल्यावर भर द्यावा. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेंट मिळेल, अशी अपेक्षाही संस्थेचे कार्यकारी संचालक तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.