लॉकडॉन काळातील मधील लाईट बिल माफी साठी विभागीय आयुक्तना MIM च्या वतीने
निवेदन..
उस्मानाबाद - ( तौफिक कुरेशी ) लॉकडॉन काळातील मधील लाईट बिल माफी साठी विभागीय आयुक्तना व जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले आहे .
22 मार्च 2020 पासुन संपुर्ण भारत देशात कोविड -19 या संसर्गजन्य रोगामुळे लॉकडाऊन लावण्यात आलेले आहेत . लॉकडाऊन काळात संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेला कसलेही मजुरीचे काम व इतर व्यवसाय बंद असल्यामुळे मोठे आर्थिक अडचणीच्या सामोरे जावे लागले आहे . त्यामुळे लॉकडाऊन मधील महाराष्ट्र व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व घरगुती व व्यवसायीक वीज बील माफ करणे अत्यंत गरजेचे आहे . याबाबत MiM पक्षातर्फे यापुर्वी वेळोवेळी संपुर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष खा इम्तियाज जलील साहेब यांच्या आदेशावरून व कार्यकारी अध्यक्ष गफ्फार कादरी साहेब यांच्या सुचनेनुसार गेल्या 2-3 आठवड्यापुर्वी महाराष्ट्रभर वीज बील माफ करण्यासंदर्भात महाराष्ट्रात निवेदन देण्यात आलेले होते व सोबतच संपुर्ण महाराष्ट्रभर 5 मिनीटासाठी लाईट बंद करून निषेध करण्यात आले होते . परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याकडुन कसलाही प्रतिसाद भेटत नसल्यामुळे पुन्हा एकदा संपुर्ण महाराष्ट्रात ए.आय.एम.आय. एम . पक्षातर्फे लॉकडाऊन काळातील वीज बील माफ करणेबाबत अथवा सुट देणे बाबत निवेदन देण्यात आले आहे असे निवेदनात नमुद केले आहे
निवेदन देताना mim शहर अध्यक्ष अजहर सय्यद, जिल्हा परवक्ता शहेबाज काझी, इम्तियाज बागवान, वसिम नीचलकर, माजी तालुकध्यक्ष, जावेद शेख, माजी शहर अध्यक्ष इर्शाद कुरेशी, नोमन रझवी, अजहर नीचलकर, सद्दाम मुजावर , समाजसेवक शाहनवाज सय्यद, मोहंमद सय्यद ईत्यादी यावेळी उपस्थित होते .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.