प्रधानमंत्री घरकूल योजनेतील 116 लाभार्थ्यांचा थकीत तिसरा हफ्ता द्यावा:खुंदमीर मुल्ला यांची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील ११६ थकित लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याची निधी त्वरित देण्यात यावी या मागणीसाठी 8 सप्टेंबर 2020 मंगळवार रोजी औसा येथील सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला यांनी नगर पालिके समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात औसा नगर पालिके मार्फत औसा शहरातील एकूण 245 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजना मंजूर झाली आहे त्यापैकी फक्त 116 लाभार्थ्यांना दोन हप्त्यात एकूण एक लाख रुपये प्राप्त झाले आहे या रकमेतून 116 कुटुंबांनी स्वतःचे राहते कच्चे घर पळून बांधकाम चालू केले आहेत व ते बांधकाम अर्धवट स्वरूपात असून त्याची पुढच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम न मिळाल्याने मागील सात-आठ महिन्यांपासून थांबले आहेत व काही लोकांनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे आणून बांधकाम पूर्ण केले आहेत तरी या त्रस्त असलेल्या लाभार्थींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते खूनमीर मुल्ला यांनी नगर पालिके समोर 8 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेला दिला आहे!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.