उजनी ग्रामपंचायतीचा निर्णय ६ सप्टेंबर पर्यंत उजनी गाव बंद कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी

 उजनी ग्रामपंचायतीचा निर्णय ६ सप्टेंबर पर्यंत उजनी गाव बंद कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी

औसा मुख्तार मणियार

औसा तालुक्यातील उजनी येथील एकाच दिवशी २८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने उजनी गावातील सर्व व्यवहार ६ सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.उजनी येथील एका राष्ट्रीय कृत बॅंक परिसरातील ७० जणांची अॅन्टिजन टेस्ट करण्यात आली असता,त्यात २८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले.कोरोनाची बाधा झालेल्यांना औसा येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदरील परिसर सील करण्यात आला.कोरोना झालेल्या बाधितांच्या संपर्कातील ७० जणांची मंगळवारी अॅन्टिजन तपासणी करण्यात आली.त्यात कंन्टेमेंट झोनमधील २८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट दिसून आले.त्यामुळे उजनी गावातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने उजनी गावातील सर्व व्यवहार ६ सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी उजनी येथील कोरोना बाधितांची संख्या आज पर्यंत ४५ वर पोहोचली आहे त्यातील चौघेजण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.एकाचा मृत्यू झाला असून ४० जणांवर उपचार सुरू आहेत.अशी माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अधिकारी डॉ आर एच देवणीकर यांनी दिली.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी शासन नियमांचे पालन करावे.लक्षणे जाणवताच तात्काळ उपचारासाठी दाखल व्हावे.तसेच तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही वैद्यकीय अधिकारी डॉ आर एच देवणीकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या