महाराष्ट्र पोलीस दलाला सॅल्यूट. पोलीस नभोमंडळातील 21 आयपीएस नक्षत्र या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी ज्येष्ठ नेते श्री शरदचंद्रजी पवार व गृहमंत्री श्री अनिल जी देशमुख यांच्या हस्ते










पोलीस नभो मंडळातील 21 आयपीएस नक्षत्र या पुस्तकाद्वारे महाराष्ट्र पोलीस दलाला सॅल्यूट.  पोलीस नभोमंडळातील 21 आयपीएस नक्षत्र या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी ज्येष्ठ नेते श्री शरदचंद्रजी पवार व गृहमंत्री श्री अनिल जी देशमुख यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाले .ग्रंथाली प्रकाशित या पुस्तकात यूपीएससी परीक्षेच्या यशाचा मंत्र देणाऱ्या 21 आजी-माजी आयपीएस अधिकाऱ्यांच्या जीवन चरित्राचा वेध घेणारी मराठी साहित्यातील ही पहिलीच साहित्यकृती आहे .शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असे पुस्तक अनेकांच्या यशोगाथा तर आपल्यापुढे उलगडते शिवाय या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना शारीरिक ,मानसिक क्षमता कशा विकसित कराव्यात याविषयी मार्गदर्शन करते .संग्रही असावे असे पुस्तक अनेकांच्या भविष्यकालीन  जीवनाला मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही .याप्रसंगी माननीय शरद पवार म्हणाले, पोलिसांबद्दल समज,गैरसमज समाजात असतात .पोलीस अधिकारी सकाळी आठ पाच ते मध्यरात्रीपर्यंत काम करत असतात .सध्या मुंबई पोलिसांबद्दल अनेक चर्चा मी वर्तमानपत्रा मधून वाचतो किंवा टीव्हीवर ती ऐकतो .पोलिसांवर होत असलेल्या टीकेबाबत मी अस्वस्थ होतो .महाराष्ट्राने देशाला अनेक कर्तुत्ववान अधिकारी दिले की जे  जातीय दंगली किंवा दहशतवादी हल्ले यासारख्या परिस्थितीदेखील डगमगले नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आणू शकले अनेक जुन्या अधिकाऱ्यांचा संदर्भ त्यांनी याप्रसंगी उलगडून दाखवले .त्याच्या आठवणींना उजाळा दिला .त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी पोलीस दलासाठी ज्या सेवा उपलब्ध करून दिल्या यासंबंधी देखील आठवणींना उजाळा दिला. प्रतिमा विश्वास यांच्या या पुस्तकाने महाराष्ट्र पोलीस दलाची परंपरा किती श्रेष्ठ आहे हे महाराष्ट्र पोलिस दलाची बदनामी करणार्‍यांना समजेल असे प्रतिपादन केले. हे पुस्तक इंग्रजी बरोबर हिंदीतही प्रकाशित झाले पाहिजे त्याचबरोबर अनेक जुने अधिकाऱ्यांच्या देखील जीवनावरती लिहिण्याविषयी चे सल्ला त्यांनी प्रतिभा विश्वास यांना दिला. याप्रसंगी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले ,बिहार व यूपी चे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये  या प्रशासकीय सेवांमधे आय ए एस  आणि आयपीएस अधिकारी होतात .महाराष्ट्रात हा टक्का फार कमी होता आता तर थोडा वाढला आहे .परंतु यु पी एस सी मध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे आणि यासाठी प्रतिभा विश्वास यांच्या या पुस्तकाने मराठी युवावर्गाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि या परीक्षेत मध्ये मराठी टक्का वाढेल याबद्दलची आशा व्यक्त केली .याप्रसंगी अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे उल्लेख त्यांनी केले .विशेषता  पुणे ग्रामीणच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला . त्यांनी चार वर्ष गडचिरोलीमध्ये काम करून पुण्यात आले आणि पुन्हा त्यांनी गडचिरोली मध्ये बदली मागून घेतली हे खरोखरच अभिमानास्पद आहे .अशी तरुण अधिकाऱ्यांची फौज महाराष्ट्र पोलीस दलात असताना महाराष्ट्रात असुरक्षिततेचे वातावरण असणे शक्यच नाही .हे पुस्तक घराघरात पोहोचले पाहिजे असेही त्यांनी प्रतिपादन केले.  या प्रसंगी मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष उषाताई तांबे आवर्जून उपस्थित होत्या  . तसेच ग्रंथालयाचे विश्वस्त संपादक सुदेश हिंगलाजपुरकर ,धनंजय गांगल लेखक संदीप काळे धनश्री धारप, रोहिणी लोकरे, आशुतोष लोकरे, श्याम मिसाळ ,अनन्या व जयदीप विश्वास उपस्थित होते.

For Detailed Story News See the Link Below: 
 
Thanks & Regards,
Proff Pratibha Biswas,
9820727624 (Phone)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या