मरखेल पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना विनंती आहे की, काल मराठा आरक्षण बाबत मा.सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. त्यामध्ये त्यांनी सदरचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करून मराठा अरक्षणास तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की आरक्षणाच्या अनुषंगाने मरखेल पोलीस स्टेशन हद्दीत कोठेही अनुचित प्रकार करू नये. मराठा संघटनांचे /समाजाचे पदाधिकारी यांनी सर्व मराठा बांधवांना शांतता राखणेबाबत आव्हान करावे.
आपल्या जिल्ह्यात अगोदरच कोविड या साथीच्या रोगाची परिस्थिती गंभीर झालेली आठ दिवसापूर्वी 200 ते 250 रुग्ण मिळत होते आता 400 रुग्ण रोज मिळत आहेत.त्यामुळे गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. येत्या 8 ते 15 दिवसात याही पेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होईल.त्यामुळे सर्व नागरिकांनी घरात राहणे गरजेचे आहे. अतिआवश्य असेल तर तोंडाला मास्क लावून बाहेर पडणे व सोशल डिस्टन्स चे पालन करणे गरजेचे आहे. सध्या नांदेड मध्ये Crpc कलम 144 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) चे आदेश लागू आहेत त्यामुळे एका ठिकाणी 4 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येता येत नाही.
आतापर्यंत सर्व मराठा बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही रक्ताचा थेंब न पडू देता शांततेच्या मार्गाने आंदोलन केली आहेत. *परंतु सध्या कोविड परिस्थिती असल्यामुळे आपण सर्वांनी शांतता राखावी.*
*काही समाजकंटक हे कुठलेतरी गाडी जाळलेले बस फोडलेले दंगलीचे जुने फोटो व्हाट्सअप्प ग्रुप, फेसबुक व इतर सोसियल मीडियावर टाकून अफवा पसरवतात त्यातून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ग्रुप अडमिन यांनी व्हाट्सअप्प ग्रुपची setting बदलून only send addmin अशी करावी*
जे कोणी समाजकंटक सोशल मीडियावर जुने कुठले तरी फोटो टाकून अफवा पसरवतील त्यांचेवर मरखेल पोलीस स्टेशन व नांदेड सायबर सेल लक्ष ठेऊन आहे. त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
रमेश सरवदे
उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर
आदित्य लोणीकर
सहा पोलीस निरीक्षक
मरखेल पोलीस स्टेशन
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.