*आई मला शाळेत जायचंय*
_________________________
आई मला शाळेत जायचंय --जाऊ दे ना ग आई
वर्गामध्ये शिकायला जायचंय--जाऊ दे ना ग आई
वर्गामध्ये बसून शिकायची गोडीच लय लय लय
रोज रोज घरीच बसून कंटाळा आलाय लय लय लय
मला मझ्या शिक्षकाची मित्राची आठवण येतेय लय लय लय !!१!!
आई मला शाळेत जायचंय- जाऊ दे ना आई
वर्गामध्ये शिकायला जायचंय जाऊ दे ना ग आई
मी तुझे सगळे ऐकीन
शाळेत जाताना मास्क पण लावते
दिवसातुन दहा वेळा हात पण धुवते
मित्राशी पर्सनल डिस्टन्स ही पाळते
मला शाळा शिकून खूप खूप मोठं व्हायचंय -जाऊ दे ना ग आई !!२!!
आई मला शाळेत जायचंय जाऊ देना ग आई
वर्गामध्ये शिकायला जायचंय जाऊ दे ना आई
अनलॉक लर्निंग मूळे शिक्षण व्यवस्थेचं कमी होतंय सार मोल मोल
शाळा न उघडल्यास अज्ञानाची दरी दिसतेय खोल खोल खोल
**पूर्वी शिक्षकाचे रोजच कानावर पडायचे बोल बोल बोल*
*वर्गातच सर्व विषयाचं ज्ञान मिळेल सखोल सखोल सखोल*
लॉकडाऊन मुळे भविष्याची चिंता वाटतेय लय लय लय
*भविष्याच्या स्पर्धेमध्ये जिंकायला खूप ज्ञान मिळवायचं जाऊ दे ना ग आई* !!३!!
आई मला शाळेत जायचंय जाऊ दे ना ग आई
वर्गामध्ये शिकायला जायचंय जाऊ दे ना ग आई
शाळेची घंटा पोराची गर्दी
शाळेत राखायची शिस्त अन गुरुची मर्जी
शाळेचा गणवेश प्रार्थनेचा सूर सूर सूर
गॅदरिंग -सहलीमध्ये घालायचा धिंगाणा -लय लय लय!!४!!
आई मला शाळेत जायचंय जाऊ दे ना वर्गामध्ये शिकायला जायचंय -जाऊ दे ना ग
**इथे दारूचे दुकाने चालतात **
सुशांतच्या न्युज आज पण दावतात
खऱ्या-खोट्याची परीक्षा तर घायवीच लागणार -लय लय लय
*लवकरच करून कोरोनाला टाटा अन बाय बाय*
फुले शाहू आंबेडकरांचे विचार वाया जाणार नाय नाय नाय!!५!!
*सोनी सचिन कांबळे*
*तपसे चिंचोली ता औसा जिल्हा लातुर*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.