मायक्रो फायनान्स कंपन्यानी दबाव टाकून कर्ज वसुली करू नये.* *जिल्हाधिकारी जी.श्रीकांत*


*मायक्रो फायनान्स कंपन्यानी दबाव टाकून कर्ज वसुली करू नये.*

                                                         *जिल्हाधिकारी जी.श्रीकांत*





              लातूर, दि.10:- जिल्ह्यातील सर्व मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कर्जदारांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना योग्य ती काळजी घ्यावी. तसेच सध्याची कोरोना ची परिस्थिती पाहून कर्ज वसुली मोहीम राबवावी. ही कर्ज वसुली करत असताना कोणत्याही कर्जदार व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप कुलकर्णी, श्री. रामटेके यांच्यासह सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, सर्व मायक्रोफायनान्स कंपनी रिझर्व बँकेच्या नियमानुसार कर्ज वाटप करतात. तसेच रिझर्व बँकेच्या नियमानुसार कोरोना काळात मार्च ते ऑगस्ट 2020 मधील कर्जाचे हप्ते हे वाढवून देण्यात आले होते व त्यावरील सर्व व्याज हे शेवटच्या हप्त्यात वसूल केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

    त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कर्जाची वसुली करताना सध्याची कोरोना ची परिस्थिती पाहता विशेष काळजी घ्यावी व वसुली करताना कर्जदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जाणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी व  सर्व कर्ज वसुली करण्यात यावी.  कोणतेही कर्ज व त्यावरील व्याज माफ होणार नाही हे सर्व कर्जदारांनी ही लक्षात घ्यावे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.

                                                        ********

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या