लातूर सत्र न्यायालयाने ठोठावली 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
लातूर-मौजे हरेगाव ता.औसा , जिल्हा लातूर येथील फिर्यादी बाबु मारूती माने वय 75 वर्ष यांनी त्याचा मुलगा मयत मारूती बाबु माने वय 52 वर्ष याला गावातील खंडू ज्ञानोबा सुरवसे यांनी पैसाच्या देण्याघेण्याच्या कारणावरून मारहाण करून मृत्यृ होण्यास कारणीभूत ठरला. लातूर जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.डी.पी.रागीट यांनी आरोपीस खंडु सुरवसे यांस कलम 304(भाग 2)नुसार 5 वर्ष सक्तमजुरी व 5000 रूपये दंड ,कलम 201 नुसार 1 वर्ष शिक्षा व 1 हजार रू दंडाची शिक्षा ठोठावली.
थोडक्यात हकिकत अशी की, सदरील प्रकरणात सरकारी पक्षांच्या वतीने एकुण 12 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचे वकील सहाय्यक सरकारी वकील अॅड.लक्ष्मण एन शिंदे(ममदापूरकर )यांनी काम पाहीले. त्यांनी घटनेबाबात सांगितले की, फिर्यादी बाबु माने यांचा मुलगा मयत मारूती बाबु माने हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. घटनेच्या एक दिवस अगोदर गावातील कव्हाळे नावाच्या व्यक्तीचे घराचे बांधकाम करण्यासाठी गेला होता. मयत हा कामावरून संध्याकाळी 7.00 वाजता घरी येवून ,जेवन करून खाटेवर आंगणात झोपला असताना यातील आरोपी खंडु सुरवसे हा दारू प्यालेल्या अवस्थेत रात्री 11.30 वाजता येवून मयतास काम आहे म्हणुन माझ्या घराकडे चल असे म्हणून बोलावून घेवून गेला. नंतर दुसर्या दिवशी सकाळी गावातील शांताबाई युवराज मांजरे ही पाणी आण्यासाठी गेली असताना तिला फिर्यादीचा मयत मुलगा मारोती हा माणिक सदाशिव सुरवसे यांच्या घरासमोर कण्हत पडलेला दिसला.
शांताबाई ने येवून सांगितल्यावर त्यावेळी फिर्यादी व त्याची पत्नी जयाबाई घटनेच्या ठिकाणी गेले. त्यावेळेला त्याचा मयत मुलगा त्याच्या पाठीवर, मांडीवर, टिचरावर मारहाण केल्याचा काळसर व निळसर दिसत होती. त्यांनी मयात मारोती यास तुला कोण ही मारहाण केली असे विचारताच तेथेच बाजूला थांबलेला आरोपी खंडु ज्ञानोबा सुरवसे यांच्याकडे मयत मारोती माने यांनी बोट दाखवले. खंडु यांनेच मारहाण केली आहे असे सांगितले. त्यावर आरोपी खंडु याने सुध्दा मीच मारहाण केली आहे तुम्हाला काय करायचे आहे ते करा असे सांगितले. त्यांनतर मयताने पाणी पिण्यास मागितले त्यास पाणी पाजले असता थोडयावेळाने मारूती हा मरण पावला अशी अशयाची फिर्याद किल्लारी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.न.29/2017 कलम 304 कलम 201 व अनुसुचित जाती जमाती कायदा कलम 3(2)(5)प्रमाणे दाखल केला. व त्याचा तपास उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे याच्याकडे देण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास अधिकारी यांनी सखोल तपास करून आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
सदरील प्रकरणात एकुण 12 साक्षीदार तपासण्यात आले. या मध्ये मुख्यत्वे फिर्यादी, बाबु मारूती माने, समाधान मारूती माने मयताचा मुलगा, घटनास्थळाचे पंच ,आणि पोमादेवी जवळगा येथील वैदयकीय अधिकारी डॉ.ताई छत्रु शिंदे तसेच तपासणीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे बयान ग्राहय धरून मारूती खंडु सुरवसे यास जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.डी.पी.रागीट यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
सदरील प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अॅड.लक्ष्मण एन शिंदे( ममदापूरकर )यांनी काम पाहिले.
त्यांना सहकार्य अॅड.कोंपले व अॅड. ढगारे तसेच ट्रायल मॉनिटरिंग सेल चे कामकाज पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी व कोर्ट पैरवी चे काम पोलीस नाईक इम्रान शेख यांनी पाहीले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.