कोविड१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणारी नीटची परीक्षा सर्वप्रकारच्या सुरक्षा उपायोजना करून घेण्यात यावी पालकमंत्री अमित देशमुख यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

 

कोविड१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणारी नीटची परीक्षा

सर्वप्रकारच्या सुरक्षा उपायोजना करून घेण्यात यावी

पालकमंत्री अमित देशमुख यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश




मुंबई, दि. 26 :

  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात  अभियांत्रिकी प्रवेशासाठीची  जेईई परीक्षा व्यवस्थित पार पडली आहे, वैद्यकीय  प्रवेशासाठीची नीट  परीक्षा आता येत्या 13 सप्टेंबर रोजी  घेण्यात येणार आहे. ही परीक्षाही कोविड१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची सुरक्षेची काळजी घेऊन आणि यासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

  वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी लातूर केंद्रातील असतात. यावर्षी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी 3 हजार विद्यार्थी बसले होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी साधारणपणे 15 हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत हे लक्षात घेऊन करोनाच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे हे आव्हानात्मक काम आहे. जिल्हा प्रशासनाने यात कोणतीही कसूर न ठेवता या परीक्षा यशस्वीपणे पार पाडाव्यात असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे

   वैद्यकीय प्रवेश परीक्षेस बसू इच्छिणार्यार लातूर केंद्रातील विद्यार्थ्यांनी कोरोनाबाबत धास्ती न बाळगता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करून निर्धास्तपणे प्रवेश परीक्षांना सामोरे जावे असे आवाहन, पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या