**बीडीओ च्या लेखी आश्वासना नंतर डोंगरगाव( हा) उपोषण कर्त्या गावकऱ्यांनी घेतली माघार*
--------------------------------------------
*पंधरा दिवसात चौकशी नाही झाल्यास पुन्हा उपोषण करणार असा इशारा बीडीओ साहेबाना दिला आहे*
__________________________
विशेष प्रतिनिधी:--लक्ष्मण कांबळे
___________________________
निलंगा :- तालुक्यातील डोंगरगाव गाव हे एक छोटेसे खेडे गाव असून या गावाची जेमतेम लोकसंख्या असून या गावातील जनतेचा सरकारी कार्यालयाशी जास्तीचा जनसंपर्क येत नसल्याचा व भोळ्याभाबड्या जनतेच्या स्वाभाविक पनाचा फायदा घेत ग्रामसेवकानी ग्रामपंचायत ला शासनाकडून गावच्या विकासासाठी आलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर केली आहे तसेच गावच्या नागरिकांना विश्वासात न अर्जात नमूद केलेल्या प्रमाणे 14 मागण्याची चौकशी व्हावी व ग्रामसेवक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे म्हणून दिनांक १सप्टेंबर 2020 रोजी आमरण उपोषणास बसले असता येथील उपोषणाची यूटब चॅनेलवर व दैनिक वृत्तपत्रात बातमी लागयावर प्रशासन जागे झाले व डोंगरगाव कर्त्याची दिनांक 3 सप्टेंबर रोजी उपोषणस्थळी बीडीओ साहेबानी भेट घेऊन लेखी स्वरूपात पत्र देऊन 14 मागणी पैकी १२ मागणीची पंधरा दिवसात चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही या कामी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नेमणूक केलेली आहे. बीडीओ साहेबांनी लेखी आश्वासन दिले मूळे उपोषण माघार घेण्यात आले. बीडीओ साहेब व पोलीस कर्मचारी यांच्या कडून उपोषण कर्त्यना नारळ पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले या वेळी गावातील जण समुदाय व महिला बालक वृद्ध मंडळी मोठया संख्येने हजर होते .* *उपोषण करते हजारे यांनी पंधरा दिवसाच्या आत जर चौकशी नाही झाली तर पुन्हा उपोषण करु असा इशारा दिला आहे*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.