पालकमंत्र्यांच्या गावातील अल्पसंख्यांकांचे मदतीला सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे धावले.
बँक ऑफ महाराष्ट्र मधील अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती धारकांच्या पालकांची होणारी हेळसांड थांबवले.
लातुर : दि. ४ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोलिस मुख्यालय बाभळगाव ता. लातूर येथील अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती धारक पाल्यांच्या पालकांची बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बाभळगाव यांचेकडून पालकमंत्र्यांच्या गावातच होणारी अडवणूक व हेळसांड लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या सहकार्यामुळे थांबली व अल्पसंख्यांक समाजातील लोकांना न्याय मिळाला.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बाभळगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोलिस मुख्यालय येथील मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुडे यांनी झिरो बँलन्सवर खाते काढण्यासाठी विद्यार्थी यादीसह बँकेला पत्र दिले होते. असे पत्र देऊनही बँकेने खाते काढण्यासाठी शिष्यवृत्तीधारक पाल्यांच्या पालकाकडून पाचशे ते बाराशे रुपयाची मागणी केली जात होती. अनेकाकडून तसे पैसेही भरून घेतले तर काही जणांच्या बँक खात्यावर जमा झालेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेतून बँकेने पैसे ही कपात करून घेतले. मागील वर्षीचे खाते काढल्यानंतर पासबुक दिलेच नाहीत अन् हरवले असा अर्ज करा म्हणत नवीन पासबुक काढण्यासाठी १२० रुपयाची स्लीप भरुन पैसे भरून घेणे व खात्यावर जमा झालेली अल्पसंख्याक शिष्यवृत्ती बँकेकडुन कपात केली. खाते शिष्यवृत्तीचे न काढता जनरल काढले. अशा अनेक अडचणी येत होत्या. पालकांनी या अडचणी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सादिक शेख यांना सांगितल्या त्यांनी या सर्व अडचणी व बँकेकडून मिळत असलेली अवमानकारक वागणूक व होत असलेली हेळसांड लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री व्यंकटराव पनाळे यांच्या कानावर घातल्या. या सर्व अडचणी सोडविण्यासाठी काल ३ सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे हे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सादिक शेख (छोटु) यांच्या विनंतीवरून पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी बाभळगाव येथे येवुन अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती धारक पाल्यांच्या पालकांच्या अडचणी जाणुन घेतल्या व बँक ऑफ महाराष्ट्रचे बाभळगाव शाखा व्यवस्थापक सोहन खरात यांच्याशी चर्चा केली. बँकेने शिष्यवृत्तीधारक पाल्यांच्या पालकांचे बँकेत खाते काढण्यासाठी पैशाची मागणी करु नये. झिरो बँलन्सवर खाते काढून पासबुक द्यावे. तसेच झिरो बॅलन्स वर शिष्यवृत्ती धारकांचे खाते काढण्याऐवजी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी चुकीने जे जनरल खाते काढली आहेत ते सर्व खाते शिष्यवृत्ती खात्यामध्ये रूपांतरित करुन घ्यावे. तसेच कपात झालेली रक्कम परत शिष्यवृत्ती धारकांच्या बँक खात्यावर जमा करून घ्यावी. बँकेने कोणालाही बळजबरीने एटीएम कार्ड देऊ नये असे सांगून पालकांचे सर्व प्रश्न सोडवले. बँकेचे शाखा व्यवस्थापक सोहन खरात यांनी अतिशय समजुतदारपणाने कर्मचाऱ्या कडून झालेली चूक मान्य करून यापुढे अशी चूक होणार नाही तसेच कपात केलेले पैसे संबंधितांच्या खात्यावर परत वळते केले जातील. आणि पासबुक साठी कोणाकडून पैसे घेतले जाणार नाहीत तसेच बळजबरीने कोणाला एटीएम पण दिले जाणार नाही असे सांगून अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती धारक पाल्यांच्या पालकांचा प्रश्न मिटवला. त्यामुळे शाळेच्या वतीने पत्रकार व्यंकटराव पनाळे यांचे शालेय व्यवस्थापन समितीने व मुख्याध्यापकांनी तसेच पालकांनी मनापासून आभार मानले आहेत.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ बसवणे भाग्यश्री, उपाध्यक्ष सादिक शेख, मुख्याध्यापिका श्रीमती रेखाताई सुडे, सहशिक्षक मसुरे सर, आसमा मेहबूब सय्यद, आयेशा इब्राहीम सय्यद, शमीरून जाकीर शेख, गुलजार अस्लम शेख, फातिमा हनीफ शेख, रजिया अन्वर शेख, परविन फरीद पठाण, इत्यादी महिला अल्पसंख्यांक पालक हजर होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.