हिप्परसोगा येथे अडी अडचणी,समस्या जाणून दूर करण्यासाठी आमदारांनी भरवला जनता दरबार

 हिप्परसोगा येथे अडी अडचणी,समस्या जाणून दूर करण्यासाठी आमदारांनी भरवला जनता दरबार 




औसा मुख्तार मणियार

औसा तालुक्यातील  हिप्परसोगा या गावातील जनतेच्या अडीअडचणी, समस्या जाणुन घेण्यासाठी व त्या दूर करण्यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी जनता दरबार भरवला.  आ. पवार यांनी गावातील मारूती मंदिरासमोरील मोकळ्या जागेत जनता दरबार भरवत उपस्थित ग्रामस्थांकडून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत, काही अडचणी जागीच सोडविल्या तसेच या भागातील शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार  व हिप्परसोगा गावासाठी सिमेंट रस्त्यांची ३ व १ सभागृह अशी २५ लाखांची विकासकामे मंजूर झाली असल्याची माहिती या वेळी ग्रामस्थांना दिली.यावेळी औसा भाजप तालुकाध्यक्ष श्री सुभाष जाधव, नगरसेवक श्री अनिल भोसले, श्री हेमंत पाटील, श्री संदीपान लंगर, श्री अमर पाटील, श्री सचिन पाटील, श्री बापुसाहेब पाटील, श्री मारोती चेवले, श्री अमोल सोमवंशी, श्री शिवराज कोरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जनता दरबारात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या