औसा नगर परिषदेला निधी कमी पडू देणार नाही -नगर विकास राज्यमंत्री.ना .तनपुरे
औसा मुख्तार मणियार
औसा :-राज्याचे नगरविकास , उर्जा, उच्च व तंत्र शिक्षण , आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन राज्य मंत्री मा ना प्राजक्त तनपुरे हे दि.25 सप्टेंबर शुक्रवारी लातूर येथे खाजगी दौऱ्यावर आले होते त्या वेळी औसाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा रा कॉ चे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या सह औसा न पचे उपनगराध्यक्ष अलीशेर कुरैशी ,आरोग्य व् स्वच्छता सभापति मुजाहेद शेख,पाणी पुरवठा सभापति गोविंद जाधव माजी नगराध्यक्ष जावेद शेख,मेहराज शेख, भरत सूर्यवंशी, साजीद काझी, शाकीर सय्यद , अशोक कांबळे ,स्वीकृत सदस्य रूपेश दुधनकर यांनी मा मंत्री महोदय यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी डॉ अफसर शेख यांनी औसा शहरातील पाणी समस्ये चे माहिती राज्य मंत्री यांनी दिली,आरोग्य व स्वच्छता सभापति यांनी औसा शहरातील विविध विकास काम करण्याकरिता भरीव निधि द्यावा असे निवेदन दिले माजी नगराध्यक्ष जावेद शेख यांनी औसा न प ला नगर विकास खात्या अंतर्गत विशेष भरीव निधी द्यावा अशी मागणी केली
मा मंत्री महोदय यांनी सर्व समस्या व निवेदन घेत म्हणाले की औसा न प ला भविष्यात निधी कमी पडू देणार नाही आणि विकास कामा साठी नगरविकास विभाग औसा न प च्या पाठीशी खंबीर उभा आहे असे राज्य मंत्री तनपुरे म्हणाले . यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे श्रीकांत सूर्यवंशी, प्रशांत पाटील, युवक शहराध्यक्ष समीर शेख, कबीर शेख, अविनाश टिके,वली पठाण, सीनेट सदस्य मोटे सर , विशाल आवाडे, सह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.