सेवानिवृत्त कर्मचाऱ्या तर्फे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांचा सत्कार

 सेवानिवृत्त कर्मचाऱ्या तर्फे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांचा सत्कार 






औसा मुख्तार मणियार

 औसा _ नगर परिषदेच्या वतीने सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ,अफसर शेख आणि मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या प्रयत्नातून सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता दिल्याबद्दल सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला, मागील अनेक दिवसापासून सातवा वेतन आयोग लागू होऊनही कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ मिळाला नव्हता, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता मिळावा म्हणून पालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी प्रयत्नशील होते, अखेर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी सेवानिवृत्त सह सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता प्रधान केला असून औसा नगर परिषद ही जिल्ह्यातील अशी एकमेव नगरपरिषद आहे, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सर्व श्री अशोक बनसोडे, आलिखा पठाण, प्रभाकर जोशी, लतिक शेख तसेच श्रीराम ताकभाते ,महमूद शेख ,अन्वर शेख ,भीमाशंकर मनगुळे आदींनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या