उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी घेतला आढावा
उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत ऑनलाइन केलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा. तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टदार यांना दिलेल्या वर्क ऑर्डर प्रमाणे कामे पूर्ण करावी. दर्जेदार कामे करावीत.
या योजनेतून चालू असलेल्या कामा मध्ये मागील काही काळात वृत्तपत्रात कॉन्ट्रॅक्टदार यांनी काम करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनकडून पैसे घेतले असतील. त्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या बिलातून कपात केली जाईल. अशा शेतकऱ्यांनी लेखी तक्रार माझ्या कडे व महावितरण अधिकारी यांच्याकडे द्याव्यात. तसेच यापुढे शेतकऱ्यांनचे सोलार पंप बसवल्यावर कॉन्ट्रॅक्टदाराने चांगल्या प्रतिचे काम केले व कसलीही तक्रार नाही असे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी लेखी घ्यावे. व नंतरच बिल देणे बाबतची कार्यवाही करावी. अशा प्रखड सूचना खासदार यांनी दिल्या.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.श्रीकांत पाटील, कार्यकारी अभियंता श्री.वाघमारे, सहाय्यक अभियंता श्री.वैभव मगर, संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.