"नीट" ची परीक्षा देणारा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास एन टी ए ला तात्काळ इमेल करावा.
परीक्षेची तारीख वाढवून मिळेल.
{ व्यंकटराव पनाळे जिल्हा प्रतिनिधी }
लातुर : दि.११- एमबीबीएस पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा संदर्भातील माहिती घेण्यासाठी लातूरचे ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी या परीक्षेचे समन्वयक प्रिन्सिपाल भारत भूषण झा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल लातूर यांच्याशी मोबाईल वरून माहिती घेत असताना "नीट" (यु जी ) ची परीक्षा देणारा विद्यार्थी जर दिनांक १३ सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेच्या अगोदरच कोरोना बाधित म्हणून रुग्णालयात दाखल असेल तर त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा बाबत काय भूमिका असणार आहे ? असे विचारले असता प्रिन्सिपाल भारत भूषण झा यांनी सांगितले की अशा कोरोना बाधित परीक्षार्थी विद्यार्थ्याने तात्काळ एन टी ए ला इमेल करावा. परीक्षेसाठी देण्यात आलेले (ऍडमिट कार्ड) प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट, शासकीय रुग्णालयाचे परीक्षा देणारा विद्यार्थी कोवीड बाधित असल्याचे प्रमाणपत्र. (पॉझिटिव्ह सर्टिफिकेट), आणि परीक्षेसाठी तारीख वाढवून मिळणे करिता करावयाचा विनंती अर्ज. ही सर्व कागदपत्रे तात्काळ एन टी ए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) यांच्याकडे ई-मेल करुन पाठवायचे आहेत. कोरोना बाधित असलेल्या विद्यार्थ्यांनी ncov19@nta.ac.in या ईमेलवर तात्काळ हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत पाठवून द्यावेत. वेळेत ई-मेल पोहोचलेल्या अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची दुसरी तारीख सांगितली जाईल. व त्यांची परीक्षा नंतर घेतली जाईल असे "निट" परीक्षेचे लातूरचे समन्वयक प्रिन्सिपाल भारत भूषण झा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल लातूर यांनी कळवले आहे.
- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.