संपूर्ण देशात एकाच दिवशी, एकाच वेळेत, एकच पेपर अशा रितीने होणारी जगातील सर्वांत मोठी परिक्षा !* बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजची "नीट" ( यु जी ) परीक्षेसाठी दोन्ही सेंटर वरील तयारी पूर्ण.

 *संपूर्ण देशात एकाच दिवशी, एकाच वेळेत, एकच पेपर अशा रितीने होणारी जगातील सर्वांत मोठी परिक्षा !* 


बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजची "नीट" ( यु जी ) परीक्षेसाठी दोन्ही सेंटर वरील तयारी पूर्ण. 






 *{ व्यंकटराव पनाळे जिल्हा प्रतिनिधी }*


लातुर : दि. ११ -  संपूर्ण देशात एकाच दिवशी, एकाच वेळेत, एकच पेपर अशा रितीने होणारी जगातील सर्वात मोठी परिक्षा दिनांक १३ सप्टेंबर २०२० वार  रविवार रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडणार आहे. देशभरात जवळपास १६ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले असून देशात सर्वात जास्त पटना शहरात २०० परीक्षा केंद्र असून येथे ७० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

 एमबीबीएस पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा "नीट" (यु जी ) च्या परीक्षेसाठी लातूर जिल्ह्यात एकूण ४३ परीक्षा केंद्रावर १५९६० विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. लातूर जिल्ह्यात उदगीर २, अहमदपूर १, औसा तालुक्यात ३, आणि लातूर शहर व लातुर तालुक्यात ३७ असे एकुण ४३ परीक्षा केंद्र आहेत. या परीक्षेसाठी परीक्षा समन्वयक १ प्रिन्सिपाल भारत भूषण झा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल लातूर आणि परीक्षा समन्वयक २ प्राचार्य रमेश राव सर नवोदय विद्यालय लातूर हे आहेत. प्रिन्सिपाल भारत भूषण झा यांच्या नियंत्रणाखाली २३ परीक्षा केंद्र तर प्राचार्य रमेश राव सर यांच्या नियंत्रणाखाली २० परीक्षा केंद्र आहेत. 

या परिक्षा केंद्रा पैकी २ परीक्षा केंद्र हे लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. शिवारातील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज, बार्शी रोड येथे आहेत. बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रभारी प्राचार्य बसवराज धरणे सर यांना प्रत्यक्ष भेटून घेतलेल्या माहितीनुसार या कॉलेजमध्ये मुख्य इमारत व नवीन इमारत अशा २ ठिकाणी या परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य इमारतीत २० हॉल मध्ये प्रत्येकी १२ विद्यार्थी असे २४० विद्यार्थी परीक्षा देतील. तर नवीन इमारतीत ६ हॉलमध्ये प्रत्येकी १२ विद्यार्थी व ७ हॉलमध्ये प्रत्येकी २४ विद्यार्थी असे २४० विद्यार्थी परीक्षा देतील. या दोन परीक्षा केंद्रावर एकूण ४८० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या दोन परीक्षा केंद्राचे परीक्षा केंद्रप्रमुख बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज मधील प्रा. नरेंद्र खटोड सर आणि प्रा. संजय मंत्री सर हे आहेत. या परीक्षेच्या कामासाठी संस्थेचे शिपाई ते केंद्रप्रमुख असे ९१ कर्मचारी व्यवस्थेमध्ये असल्याचे प्राचार्य बसवराज धरणे सर यांनी सांगितले. परीक्षेची वेळ दुपारी २ ते ५ असली तरी प्रत्यक्षात सकाळी ११ वाजल्यापासून रिपोर्टिंग सुरू होणार आहे. तसेच येणाऱ्या सर्व परीक्षार्थींची परीक्षा केंद्रावर कोरोना चाचणी तसेच प्रवेशाच्या वेळी सुरक्षाविषयक तपासणी होणार असल्याचेही प्राचार्य धरणे सर यांनी सांगितले. यदाकदाचित एखादा विद्यार्थी परीक्षा केंद्रावरील कोरोना चाचणीमध्ये कोरोना बाधीत आढळल्यास त्याला परीक्षेसाठी विलगीकरण कक्षात पी पी इ किट सहित स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. दोन्ही परीक्षा केंद्राचे प्रमुख प्रा. खटोड सर आणि प्रा. मंत्री सर यांनी परीक्षा केंद्रावरील हॉलची व्यवस्था दाखवली. याठिकाणी विद्यार्थ्यांच्या साठी परीक्षा हॉलमधील योग्य ते अंतर ठेवून आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वच परीक्षा हॉलमध्ये भिंतीवर घड्याळ लावलेले आहेत. तसेच सर्व हॉलमध्ये आणि परीक्षा केंद्राच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण महाविद्यालयात सँनीटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची ही माहिती मिळाली.  


मागील काही दिवसापासून लातूर महानगरपालिकेने बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी वस्तीग्रह ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोविंड सेंटर बनवण्यात आले होते. मात्र "नीट" च्या परीक्षेचे दोन परीक्षा केंद्र बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये असल्यामुळे महानगरपालिकेने दिनांक ११, १२, १३ या तीन दिवसासाठी कोविड सेंटर बंद करून तेथील रुग्ण अन्य ठिकाणी हलवले आहेत. व संपूर्ण इमारत आणि परिसर सँनिटायझरची फवारणी करून स्वच्छ केला आहे. याबद्दल लातूर महानगरपालिकेचे आयुक्त टेकाळे साहेब आणि उपायुक्त नंदा साहेब यांचे खूप चांगले सहकार्य लाभले असून महाविद्यालयाचे प्राचार्य धरणे सर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांचे आभार मानले आहेत.  


- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार. 

   ९४२२०७२९४८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या