*
*पत्रकारांच्या कल्याणासाठीच कार्य करणार- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर*
*नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्ती पत्र प्रदान* रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई विभाग व तळा तालुक्यातील नवनियुक्त पदाधिका-यांना संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे व राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, तळा तालुका अध्यक्ष सुरेंद्र शेलार, तळा तालुका संघटक नजीरभाई पठाण, टिटवाळा (मुंबई) शहराध्यक्ष शरद पवार, मुंबई सदस्य पराग मोरकर, मुंबई सदस्य दिनकर पवार या पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्यावर संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी संघटनेचे मुंबई कार्यकारिणीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांचा सत्कार तर तळा तालुका कार्यकारिणीच्या वतीने राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी संपादक व पत्रकारांचे न्याय, हक्क, कल्याण व उत्कर्षासाठी कायम कार्य करणार असून कोरोना व लाॅकडाऊन काळात संपादक व पत्रकारांना ज्या समस्येचा सामना करावा लागत आहे त्या समस्येचे निराकरण करणार असल्याचे सांगितले. तर राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावणे व पत्रकारांचे कल्याण करणेसाठी पूर्णवेळ देणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पत्रकारांच्या हितासाठी संघटनेचे उत्कृष्ट कार्य सुरू असल्यामुळे संघटना ग्रामीण भागापर्यंत लवकर पोहचली असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी नवनियुक्त पदाधिका-यांनी संघटनेचे ध्येय धोरणांचे अधिन राहून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला.
*नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्ती पत्र प्रदान*
रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई विभाग व तळा तालुक्यातील नवनियुक्त पदाधिका-यांना संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे व राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, तळा तालुका अध्यक्ष सुरेंद्र शेलार, तळा तालुका संघटक नजीरभाई पठाण, टिटवाळा (मुंबई) शहराध्यक्ष शरद पवार, मुंबई सदस्य पराग मोरकर, मुंबई सदस्य दिनकर पवार या पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्यावर संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी संघटनेचे मुंबई कार्यकारिणीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांचा सत्कार तर तळा तालुका कार्यकारिणीच्या वतीने राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी संपादक व पत्रकारांचे न्याय, हक्क, कल्याण व उत्कर्षासाठी कायम कार्य करणार असून कोरोना व लाॅकडाऊन काळात संपादक व पत्रकारांना ज्या समस्येचा सामना करावा लागत आहे त्या समस्येचे निराकरण करणार असल्याचे सांगितले. तर राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावणे व पत्रकारांचे कल्याण करणेसाठी पूर्णवेळ देणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पत्रकारांच्या हितासाठी संघटनेचे उत्कृष्ट कार्य सुरू असल्यामुळे संघटना ग्रामीण भागापर्यंत लवकर पोहचली असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी नवनियुक्त पदाधिका-यांनी संघटनेचे ध्येय धोरणांचे अधिन राहून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.