आ.अभिमन्यू पवार यांनी घेतली औसा तालुक्यातील लोकप्रतिनिधीची आॅनलाईन आढावा बैठक.

 आ.अभिमन्यू पवार यांनी घेतली औसा तालुक्यातील लोकप्रतिनिधीची आॅनलाईन आढावा बैठक. 








औसा - गाव विकासाच्या दृष्टीने होणारी विकास कामे,लोकप्रतिनिधीना शासकीय योजनेची माहिती, काम करताना येणाऱ्या अडचणी त्या बाबत उपाययोजना आदीसह अन्य बाबींचा आढावा घेण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी दि.२५ सप्टेंबर रोजी औसा पंचायत समितीमधून औसा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच,प्रशासक यांची आॅनलाईन आढावा बैठक घेतली. 




             या आढावा बैठकीला आ.अभिमन्यू पवार यांच्यासोबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ,नायब तहसीलदार वृषाली केसकर,सभापती कल्पना गायकवाड,आदी, उप अभियंता जयंत जाधव,बाल विकास अधिकारी मोरे, विस्तार अधिकारी उपस्थित होते या आॅनलाईन आढावा बैठकीतून औसा तालुक्यातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये आ. अभिमन्यू पवार यांनी सरपंच,उपसरपंच व प्रशासक यांच्याशी संपर्क साधत वेगवेगळ्या विषयांवर सखोल चर्चा केली.यामध्ये प्रामुख्याने पाणंद रस्ते,मनरेगातून विहिरींची दुरुस्ती,गाव अंतर्गत रस्ते,सार्वजनिक पाणीपुरवठा,जनावरांना गोटा योजना,स्मशानभूमी रस्ते,गावातील रोहित्री दुरुस्ती आदी कामे व येणाऱ्या  अडचणी याबद्दल काही सरपंच व उपसरपंच यांनी मांडल्या यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी या बैठकीतून मांडलेल्या या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक माहिती घेत काही प्रश्न या आढावा बैठकीतच सोडवून काही कामाबद्दल उपाययोजना करीत संबंधित विभागाला काही सुचना दिल्या.



               यानंतर आ. अभिमन्यू पवार यांनी या आढावा बैठकीतून सांगितले की प्रत्येक गावाच्या विकासासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात येवून या कृती आराखडयात जनावरांचे गोटे,घरकुल योजना,शेतरस्ते आदी कामांचा प्रामुख्याने समावेश करावा.लवकरच मनरेगातून गावाचा विकास कसा साधायचा यासाठी एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.स्मशनभुमी ला जाणारे रस्ते हे मनरेगा च्या धर्तीवर केले जाणार असून जनावरांना गोटा या योजनेचा अधिक अधिक लाभ लोकांना देण्यावर भर दिला जाईल स्मशानभूमी व पाणंद रस्ते या कामावर प्रामुख्याने लक्ष दिले जाईल. शेतकऱ्यांनी पोखरा योजनेचा लाभ घ्यावा.रेशीम लागवड हि योजना कृषी विभागाकडे वर्ग करावी अशीही मागणी आपण कृषीमंत्र्याकडे केल्याचे सांगून गावातील राजकारण बाजूला ठेवून गाव विकासाकडे लक्ष द्यावे असे हि आवाहन यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी या आॅनलाईन आढावा बैठकीतून केले. 



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या