भारतीय जनसंघाचे शिल्पकार राष्ट्राभिमानी नेतृत्व पं. दीनदयाळजी उपाध्याय यांची जयंती साजरी.

 भारतीय जनसंघाचे शिल्पकार राष्ट्राभिमानी नेतृत्व पं. दीनदयाळजी उपाध्याय यांची जयंती साजरी. 





लातुर : दि. २५ - आज दिनांक २५ सप्टेंबर वार शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजता पं. दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंती निमित्त "मंदार" हरंगुळ (बु) येथे भारतीय जनता पक्षाचे  व्यंकटराव पनाळे यांच्या निवासस्थानी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे व्यंकटराव पनाळे आणि छत्रपती श्री संभाजी राजे मंडलाचे अध्यक्ष ज्योतीराम चिवडे यांनी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आणि त्यानंतर व्यंकटराव पनाळे यांच्या घरावर भारतीय जनता पक्षाचा ध्वज लावण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या