आ. अभिमन्यू पवार यांनी वाहिली डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रध्दांजली.

 आ. अभिमन्यू पवार यांनी वाहिली डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रध्दांजली.









औसा - राष्ट्रसंत परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनची दु:खद बातमी समजली महाराजांच्या पावन स्मृतीना कोटी कोटी नमन आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आशा शब्दात औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यांनी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रध्दांजली वाहिली.



                  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात आणि समाज परिवर्तनाच्या चळवळीत कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.लाखो भक्ता सारखा मीही महाराजांचा भक्त आहे. त्यांच्या प्रति मनात प्रचंड भक्ती श्रध्दा आणि आदर आहे. त्यांच्या सानिध्यात घालवलेले अनेक भक्तीयुक्त क्षण आठवत आहे.त्यांचे जवळपास १०४ वर्षाच्या भक्ती व समाजसेवाला वाहिलेले आयुष्य आणि आदर्श आणि मार्गदर्शक आहे.त्यांची तब्येत ठिक नसल्याचे कळाल्यानंतर २५ आॅगस्ट रोजीच मी त्यांची भेट घेवून विचारपूस करीत आशिर्वाद घेतला होता.ते आजारातून बरे होतील असे वाटत होते.पण हि दु:खद बातमी आली.हे दु:ख सहन करण्याचे बळ सर्व अनुयायांना, भक्तांना मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना असेही आ. अभिमन्यू पवार यांनी आपल्या शोक संदेहव्दारे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनानंतर श्रध्दांजली वाहिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या