शेतकऱ्यांसाठी धावले खासदार व आमदार
औसा मुख्तार मणियार
औसा येथे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमख उपस्थित महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंतासह प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक दि.१२ सप्टेंबर रोजी औसा येथे पार पडली या बैठकीत समोर आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याची सुचना महावितरण अधिकाऱ्यांना यावेळी आ. अभिमन्यू पवार व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्या.
या आढावा बैठकीत ३० डिसेंबर रोजी आ.अभिमन्यू पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मांडण्यात आलेल्या सुचनेवरुन कोणते कामे पूर्ण झाले व कोणती कामे अद्याप झालेली नाहीत याची माहिती घेतली यावेळी उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांनी त्या बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या समस्या पैकी ६१ कामे पूर्ण केल्याची माहिती या बैठकीत दिली.या बैठकीत शेतकऱ्यांनी वीज जोडणी लवकर मिळत नाही.रोहित्री लवकर दिल्या जात नाहीत आशा तक्रारी केल्या यावेळी संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांच्या विभागातील महावितरण अभियंता यांना बैठकीत याबाबत जाब विचारुन शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सुचना करीत संबंधित शेतकऱ्यांना मांडलेली अडचण सांगितलेल्या वेळीत महावितरण कंपनीने नाही सोडविल्यास आपणाकडे याची माहिती द्यावे असे आमदार अभिमन्यू पवार व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.