प्रेस संपादकव पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग*

 *प्रेस संपादकव पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग*

 





  लातुर प्रतिनिधी:-


 लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील सुमठाणा हे छोटंस गाव.गेल्या आठ- दहा दिवसापासून गावात चिकनगुणीया या रोगाने थैमान घातले असून प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देऊन गावक-यांना शांत करीत होते ही बातमी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांना समजताच प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून काही तासामध्ये सुमठाणा गावात प्रशासनाकडून जंतूनाशक  फवारणी व पाण्यात जंतूनाशक औषध टाकून सर्वे करण्यात आल्याने गावक-यांनी समाधान व्यक्त केले. एका बाजूला देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असतांनाच या गावात चिकणगुणीया या रोगाने नागरिक त्रस्त असून प्रशासनाने दुर्लक्ष करणे किती गंभीर बाब आहे ही  चर्चा सर्वत्र सुरू आहे. प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावासाठी जर वेळकाढूपणा करीत असेल तर गावक-यांनी जायचं कुठं असा प्रश्नही निर्माण झालेला आहे. पत्रकार डी.टी. आंबेगावे यांच्या तक्रारीची प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्यामुळे गावत साथरोगाचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता आहे. यापुढे सुमठाणा गावातील समस्यासंदर्भात प्रशासनाने असा हलगर्जीपणा किंवा दिरंगाई होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या