भारतीय जनता पार्टि जिल्हा सरचिटणीसपदी जेष्टनेते आदम शेख , भटक्या विमूक्त आघाडि जिल्हाध्यक्षपदी सिताराम वनवे

 भूम





      भारतीय जनता पार्टि जिल्हा सरचिटणीसपदी जेष्टनेते आदम शेख , भटक्या विमूक्त आघाडि जिल्हाध्यक्षपदी सिताराम वनवे तर भूम- परंडा -वाशी विधानसभा मतदार संघातील बुजूर्ग नेते जालिंदर मोहिते यांची राज्य परिषद सदस्यपदी तर मिडिया सेल जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत मोहिते यांची निवड झाल्याने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम तालुका पदाधिकाऱ्यांनी केला .


     शनिवार दि १२ सप्टेंबर  रोजी भारतीय जनता पक्षाच्या पक्षीय निवडी जाहिर केल्या आहेत . यामध्ये पक्षातील एकनिष्ठता , आजपर्यत केलेले पक्ष स्तरावरूनचे कार्य विचारात घेवून वरिष्ठांनी या निवडि केल्याचे दिसून येत् आहे .


      नवनियूक्त जिल्हा सरचिटणीस आदम शेख , भटक्या विमूक्त आघाडि जिल्हाध्यक्ष सिताराम वनवे , राज्य परिषद सदस्य जालिंदर मोहिते , मिडिया सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत मोहिते यांनी प्रत्येक निवडणूकीत पक्षीय धोरणानुसार उमेदवारास मताधिक्य मिळवून देणे , वेळोवेळी पक्षीय कार्यक्रम घेणे , सभासद नोंदणी सर्वाधिक करणे , पक्ष संघटन वाढवणेचे काम निष्ठेने केले आहे . यामुळे या नेत्यांना पक्ष स्तरावर पदोन्नती दिल्याचे दिसून येत आहे .


     नुतण पदाधिकारी यांचे पक्ष पदाधिकारी यानी विशेष बैठक कोविड १९ चे नियम पाळत घेवून अभिनंदन केले 


      यावेळी अभिनंदनपर बैठिकसाठी नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस आदम शेख , भटक्या विमूक्त आघाडिचे जिल्हाध्यक्ष सिताराम वनवे  यांचेसह तालुका अध्यक्ष महादेव वडेकर , संतोष सुपेकर. , शंकर खामकर , सुदाम पाटिल , भाऊसाहेब कुटे ,समाधान बनसोडे , नवनाथ पाटिल , महेबूब शेख , हेमंत देशमुख , सौ लताताई गोरे , राहूल गुंजाळ, अंकुश करडे , बापू बगाडे , सुजित वैदपाठक यांची उपस्थिती होती .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या