दिव्यांगांनी मोफत संगणक प्रशिक्षणाचे लाभ घेण्याचे आवाहन

 दिव्यांगांनी मोफत संगणक प्रशिक्षणाचे लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली,दि.2: दिव्यांग कल्याण आयुक्तालय व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह या संस्थेकडून सर्टीफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स), मोटार अँड आर्मेचर रिवायंडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स) आणि एम.एस.सी.आय.टी. (संगणक कोर्स) या कोर्ससाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे.

यासाठी अटी व शर्ती- वयोमर्यादा 16 ते 40 वर्षे, प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षे, शैक्षणिक पात्रता 8 व 9 वी पास, प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड च्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना.

 अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली-416410, दूरध्वनी क्रमांक- 0233-2222908, मोबाईल क्रमांक-7972007456, 9922577561, 9975375557 या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, ता. मिरज जि. सांगली यांनी केले आहे.

****

     जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

हिंगोली,दि.2:   जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणुचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपुर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त चालू आहे. तसेच 7 व 8 सप्टेंबर रोजी मुंबई येथे पावसाळी अधिवेशन आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दि. 6 सप्टेंबर, 2020 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दि. 20 सप्टेंबर, 2020 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी आदेश काढले आहेत.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात येत अहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  तसेच विशेषरित्या परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक, हिंगोली किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी यांना राहतील, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या