निलंगा येथे रस्त्यावरील खड्यात मनसे ने केले 'बेशरम रोपण'

 निलंगा येथे रस्त्यावरील खड्यात मनसे ने केले 'बेशरम रोपण'




निलंगा :गेली अनेक दिवसांपासून निलंगा शहरामध्ये सर्वत्र खड्याचे साम्राज्य पसरले आहे आणि त्यातल्या त्यात शिवाजी चौक ते बँक कॉलॉनी रोड हा फक्त नावालाच डांबरी रस्ता म्हणून राहिला आहे खरे तर पुर्णतः डीवाईडर व मोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता       वाहनचालकासाठी जीवघेणा ठरत आहे. याचा निषेध नोंदवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली खड्यामध्ये बेशरमाचे झाड लावत प्रशासनाचा निषेध केला.खरे तर पाण्याच्या पाईपलाईन चे काम ज्यावेळेस पासून केले गेले त्यावेळेस पासून शहर अंतर्गत रस्ते हे कमालीचे दुरावस्थापूर्ण झाले आहेत आणि तेव्हापासूनच निलंगा शहरात रस्त्यांवर वाहने चालवणे जिकरी चे झाले आहे. त्यातच आता पावसाळ्यामुळे एकतर मोठाले खड्डे व त्यात साचलेले पाणी या संयोगामुळे सतत अपघात होत आहेत,लोक वाहनाहून पडत आहेत.प्रशासनाने राजा उदार झाला या उक्तीनुसार मुरमाणे खड्डे बुझवणे चालू केले.ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर दगड आणि चिखल झाला आहे त्यामुळे वाहन चालवणे आणखीनच अवघड झाले आहे. तरी लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती पक्क्या स्वरूपाची करून प्रशासनाने आपण नागरिकांचे पालक आहोत हे दाखवण्याची गरज आहे.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण जनता खराब रस्त्यांमुळे अतिशय त्रस्त झाली आहे.या वेळी या आंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष सूरज पटेल,सचिव जाकीर शेख,शहरअध्यक्ष प्रदीप शेळके,जिल्हाप्रसिद्धिप्रमुख यश भिकाणे,उपाध्यक्ष शेख शरीफ,शेख इम्रान,गणेश उसनाळे,खाजा शेख,मुजीब सौदागर,सरदार मुजावर,उमर देशमुख,अंसार शेख आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या