अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतीपिकाची पाहणी करण्यासाठी कार्यालयाबाहेर पडत नसलेल्या प्रशासनासह,कृषीमंत्री महोदयांना झोपा काढण्यासाठी पलंग आणि गादी भेट देऊन आंदोलन करणार...

 औसा तालुक्यासह विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतीपिकाची पाहणी करण्यासाठी कार्यालयाबाहेर पडत नसलेल्या प्रशासनासह,कृषीमंत्री महोदयांना झोपा काढण्यासाठी पलंग आणि गादी भेट देऊन आंदोलन करणार....... शिवकुमार नागराळे मनसे.








         चालू खरीप हंगामात दुबार- तिबार पेरणी करूनही सदोष बियाणांमुळे सोयाबीन हे वान न उगवल्याने आणि नंतर काबाड कष्ट करून हाता-तोंडाशी आलेले सोयाबीनसह मूग,उडीद, सूर्यफूल व पिवळा इत्यादी नगदी पिके अतिवृष्टीने उध्वस्त झाल्याने तसेच उभा ऊस वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी मोठ्या दुष्टचक्रात सापडला आहे, झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडले असून संपूर्ण शेती व्यवसाय कोलमडून पडला आहे.यामुळे शेतकऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था  झाली असून अशा परिस्थितीत  खबरदारी आणि जबाबदारीच्या वल्गना करणार्या आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे केवळ कागदोपत्री आदेश काढणाऱ्या या शासनाचा एकही प्रतिनिधी अथवा प्रशासनातील कुठलाही अधिकारी आणखीही गाव शिवाराच्या आत फिरकलेला दिसून आला नाही,कार्यालयात बसून शेतकरी वर्गाची झालेली ही दयनीय अवस्था पाहणाऱ्या सुस्त व निर्ढावलेल्या कृषी अधिकार्‍यांसह इतर यंत्रणा व कृषिमंत्र्यांनी कार्यालयाबाहेर पडून अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाची पाहणी व पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक स्वरूपाची मदत देऊन शेती पिकाच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी पिक विमा कंपनीस इसार,अग्रीम मावेजा (ॲडव्हान्स) म्हणून पन्नास टक्के रक्कम त्वरीत मंजूर करून शेतकर्याच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश द्यावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना दसरा व दिवाळी सण साजरा करता येईल आणि रब्बीच्या पेरणीस थोडीफार मदत होईल.

  येत्या सोमवार पर्यंत तालुक्यात सरसकट पंचनामे करून याविषयी कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित प्रशासनास कार्यालयात बसून झोपा काढण्यासाठी पलंग व गादी भेट देऊन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.आपले नम्र : शिवकुमार नागराळे मनसे तालुका अध्यक्ष, मुकेश देशमाने शहराध्यक्ष, महेश बनसोडे कृषी ता.अध्यक्ष, जीवन जंगले मनविसे,  धनराज गिरी तालुका सचिव, विकास लांडगे ता.सचिव,राजेंद्र कांबळे का.सेना ता.अध्यक्ष,सतीश जंगाले वा.से.ता.अध्यक्ष,अमोल परिहार ता.उपाध्यक्ष,सचिन बिराजदार ता.उपाध्यक्ष,महादेव गुरूशेट्टे ता.उपाध्यक्ष,अतिक शेख,प्रकाश भोंग, गुणवंत लोहार तानाजी गरड, गोविंद चव्हाण,विवेक महावरकर,उमाकांत गोरे,दशरथ ठाकूर,बालाजी शिनगारे,सोहेल शेख,अमोल थोरात,अनिल बिराजदार,शंकर शिंदे,गणेश काळे, समाधान फुटाणे,हणमंत येणगे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या