*पटेल ना पटेल पण नगराध्यक्ष मुजिबोद्दीन पटेलच !* तेथे कर माझे जुळती ! *"फजर से मगरीब तक"* एक ही ध्यास, औसे का विकास, ...एक काळ होता मुजिबोद्दीन साहेबांचा,
आदरणीय विलासराव देशमुख म्हण त ,.... *पटेल ना पटेल पण नगराध्यक्ष मुजिबोद्दीन पटेलच !* ... औशाच्या मातीशी इमान राखणारा, शहरांतील मोठ्या, छोट्या, अठरापगड जातींच्या गोरगरिबांना आपल्या प्रेम विश्वास आलूलकीने थेट संपर्क संवाद साधणारा चोवीस तास ... नगर परिषदेच्या कामाचं वेड असणाऱ्या एक थोर व्यक्क्तित्वास आज आपण मुकलो आहोत,
राजकीय जीवनाची सुरुवात माजी आमदार मल्लिनाथजी महाराजांच्या काळात झाली, जवळपास 30,वर्षे नगरसेवक आणि तेरा-पंधरा वर्षे सलग या ऐतिहासिक अध्यात्मिक शहराचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष म्हणून साहेबानी उल्लेखनीय कार्य केले,
औसा बाजार समितीच्या स्थापणेतही मोठा वाटा होता,आत्ताचे औसा मार्केट यार्ड सुरू करताना पाव पैसा न भरता यार्डात पाणी,लाईट पोल, व कांड्या,त्यांनीच दिल्या, मी सचिव, म्हणायचे, ..."कुछ भी जरूरत हो तो बोलो ,अगर आपणा बाजार बढेगा, तो खुद्द ब खुद्द औसा शहर बढेगा,ये ध्यानमे रखो"
मुस्लिम समाजातील लोकांची जेवढी जवळीक तितकीच हिंदू बोद्ध व सर्वच धर्मियांच्या, जाती जमतीच्या अठरापगड जनतेशी आपुलकीची प्रेमाची जिव्हाळ्याचे संबंध असणारा माणूस,
औशाच्या प्राचीन श्री नाथ सवस्थानाचा पटेलजीचा सतत संबध संपर्क असे माजी आमदार ,मल्लिनाथजी महाराज,सद्गुरू द्यनेश्वर महाराज औसेकर, यांच्याशी स्नेह आदर भाव होता, माजी आमदार अड शिवशंकरअप्पा उटगे,भीमाशंकरदादा उटगे, यांचा सहयोग नेहमीच असे,!
हिंदूंच्या सणाची माहिती चालीरीती यांची चांगली जाण, अस्था त्याना होती, ते औसा शहरातील गल्ली बोळात ... नळाला पाणी आले का? गणपति विसर्जनाच्या आधी सगळं व्यवस्थापन पुर्ण झाले का? हे ते जातीने स्वतः पायी फिरून सगळयांनाच बोलणारे मुजिबोद्दीन साहेब हे लोकवेडे, कामवेडे, नगराध्यक्ष होते , आदरणीय विलासरावजीनी त्याना औसा शहर विकासात भरभरून मदतही त्यावेळीं केली आम्हीं अनेकदा त्यांचे समवेत मुंबईत गेलो होतो,असो,
अनेक आठवणी आहेत, सद्गुरू गुरुबाबा महाराज सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांच्याशी मुजिबोद्दीन पटेल साहेबांचे खुप स्नेहाचे संबंध होते परवाच बकरिद् सणा दिवशी गहिनीनाथ महाराजांनी त्यांना मोबाईलवर ईद मुबारक शुभेच्छाही माझ्या समोर दिल्या होत्या,
एक चांगला वकील, राजकारणी, निःस्वार्थ समाजसेवक सर्व धार्मियाना आपला वाटणाऱ्या माणसाला आपण मुकलो हे सत्य,
आदरणीय वकिलसाहेब मुजिबोद्दीन पटेल याना औसा शहरवासिय कधीच विसरणार नाहीत,
पटेल साहेबांचे कुलकर्णी लामजनकर कुटुंबियांचे प्रेमाचे आदराचे नाते होतें आमच्या वडिलांच्या शब्दांवर त्यांनी मला जवळ केले होते याचीही आठवण मला या प्रसंगीं होत आहे,,
त्यांच्या जाण्याने दुःख तर झालेच, त्यांना अल्ला ईश्वर माऊली विठ्ठल चिरशांती देवो, त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याचे बळ देवो ही पार्थना, आणि भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,जय हरी!- *शब्दांकन-अड.शामभाऊ कूलकर्णी-औसा.*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.