लातूर जिल्ह्यातील प्रख्यात कायदेपंडित तथा औशाचे माजी नगराध्यक्ष मुजीबोद्दीन पटेल यांचे निधन... रुटा कुच इस अदा से के रुत ही बदल गई .. एक शख्स सारे शहर को विरान कर गया...

 लातूर जिल्ह्यातील प्रख्यात कायदेपंडित तथा औशाचे माजी नगराध्यक्ष मुजीबोद्दीन पटेल यांचे निधन... 


रुटा कुच इस अदा से के रुत ही बदल गई ..


एक शख्स सारे शहर को विरान कर गया......







औसा प्रतिनिधी /-लातूर जिल्हा अल्पसंख्याक नेत्यांनी वंचित.लातूर जिल्ह्यातील प्रख्यात कायदेपंडित तथा औशाचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. मुजीबोद्दीन पटेल यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होते.


 अ‍ॅड. मुजीबोद्दीन पटेल यांनी 19 64  मध्ये वकिली आणि सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. राजकारण व समाजकारण करत आयुष्यभर औसा शहराच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षितिजावर ते प्रकाशित राहिले. काँग्रेसच्या सत्तेत असताना त्यांना महाराष्ट्र राज्य हज कमिटी, मराठवाडा वक्फ बोर्डाचे सदस्यही म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. अॅड (वकीली) व्यवसायात आपली पकड निर्माण केले होते. त्यांनी औसा येथील आपल्या साथीदारांच्या मदतीने फखरुद्दीन अली अहमद एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने हजरत सूरत शाह उर्दू प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेची पायाभरणी करुन उर्दू शिक्षणाचे आयोजन केले.


 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेस च्या विविध पदांवर तसेच राजकीय पदावरही काम केले होते. औसा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत दोनदा अत्यंत कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. लातूर जिल्ह्यात आणि विशेषत: औसा शहरात शांतता व सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आजपर्यंत टिकून राहणारी उत्कृष्ट रणनीती त्यांनी स्वीकारली होती.


 आपल्या संयम व अत्यंत नम्र आणि आदरातिथ्य स्वभावामुळे परिचित होते. सर्वांशी हसत खेळत मन मिळावू स्वभाव हीच निती त्यांना भोवली व शहराचे 15 वर्षे नगराध्यक्ष म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर  सामाजिक राजकीय  चर्चा करत होते. शहराच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी व नगरपालिकेच्या उत्पन्नाचे कायमस्वरूपी स्त्रोत वाढविण्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार केल्या. काँग्रेस राजकारणातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. जनहितार्थ, शहरातील रस्ते, पथदिव्यांची कामे त्यांच्या कालावधीत झाली. होती त्यामुळे लोकांमध्ये लोकप्रियता वाढली. 


दिवंगत अ‍ॅड. मुजीबोद्दीन पटेल त्यांच्या पश्चात पत्नी , 7 मुले आणि विवाहित 3 मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.


[अॅड.म.मुजीबोद्दीन इस्माइल पटेल जिवन परिचय..


===========================


*** जन्म... 03/02/1939 औसा


शिक्षण.. B.A LLB


***1964 पासुन वकीली व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग


*** 1968 पासुन राजकारणात प्रवेश व  नंतर नगर परिषद औसा चे नगरसेवक म्हणुन निवड


***सतत 35 वर्ष नगर सेवक व 17 वर्ष नगराध्यक्ष पदी विराजमान



सर्वगुणसंपन्न तथा सुसंस्कृत राजकारणी काळाच्या पडद्याआड.

# 1964 पासुन 1968 पासुन सतत 35 वर्ष नगरसेवक व 17 वर्ष नगराध्यक्ष म्हणुन औसा नगर परिषदे वर आपली छाप पाडली.


# माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे ते विश्वासु.


# नगर परिषदेला कायम स्वरुपी इन्कम व्हावे म्हणुन शहरात शाॅपींग काॅम्पलेक्स चे निर्माण.


रुटा कुच इस अदा से के रुत ही बदल गई ..


एक शख्स सारे शहर को विरान कर गया......


# महाराष्ट्रात प्रथमच त्यानी नगर परिषदे च्या माध्यमातुन अंत्यविधी अनुदान योजना राबविली.

*** नगराध्यक्षपदाच्या काळात औसा शहराच्या सर्वांगीन विकासात भर, अनेकविध योजनांच्या माध्यमातुन शहरात शाॅपिंग काॅम्पलेक्स, रस्ते, व इतर नागरी सुविधांचे नियोजन,


***शहरातील शांतता व सुव्यवस्था साठी अग्रेसर राहुन औसा शहर शांतता प्रिय शहर म्हणुन नामोल्लेख.


***फखरोद्दीन अली अहेमद एज्युकेशन सोसायटी औसा च्या माध्यमातुन औसा शहरात उर्दु शिक्षणाची सोय .. 


***हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी औसाच्या स्थापनेत सहभागी .


***महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य 


*** महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड चे लातुर जिल्हा अध्यक्ष म्हणुन सेवा


***भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे राज्य व जिल्हा पदाधिकारी म्हणुन कार्य.


***जमियते उल्माये मराठवाडा चे उपाध्यक्ष  व सचिव म्हणुन सामाजिक व धार्मिक सेवा


***शहरातील गरजु व गोरगरिबांना व्याजाच्या मुक्त करण्या साठी "बिनव्याजी पतसंस्थे" ची स्थापना.


***सर्व राजकिय पक्षांच्या कार्यकर्ते व नेत्यांशी सौहार्दाचे नाते व जनतेशी थेट संबंधा मुळे लोकप्रिय 


***


Md.Muslim Kabir,

Latur Distt. Reporter

09175978903/8208435414

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या