औशात नगरपालिकेची वीना मास्क फिरणा-या व सोशल डिस्टंस न पाळणाऱ्या व्यक्ती वर दंडात्मक कार्यवाही
औसा मुख्तार मणियार
औसा शहरात व ग्रामिण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिक व वाहनांची तोबा गर्दी होत आहे.अशा स्थितित नागरिक वीना मास्क तर अनेक जण परवानगी पेक्षा जास्त लोक प्रवास करण्याचे प्रमाण वाढले आहेत.दि १५ संप्टेंबर २०२०मंगळवार रोजी दिवसभर औसा नगरपालिकाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व नगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जनजागृती करण्यात आली आहे.दि १६ संप्टेंबर बुधवार पासून नगरपालिकेच्या वतीने वीना मास्क फिरणा-या व्यक्ती व सोशल डिस्टंस न पाळणारे व्यापारी,ग्राहक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी जाहिर केले आहे.यावेळी नगरपालिकाचे उपनगराध्यक्ष जावेद शेख,मुजाहेद शेख,मेहराज शेख, गोवींद जाधव,आदि नगरपालिकाचे कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.