कोरोना महामारीवर उपाययोजनेसाठी केलेल्या खर्चाची सखोल चौकशी करा: खुंदमीर मुल्ला
औसा मुख्तार मणियार
औसा शहरात व परिसरात औसा नगर परिषदेने कोरोना महामारीवर उपाययोजनेसाठी केलेल्या खर्चाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला औसा यांनी दि.१६ संप्टेंबर २०२० बुधवार रोजी औसा तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी लातूर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी या निवेदनात त्यांनी लिहिले आहे औसा शहरातील व परिसरातील कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी व कंटेंन्मेट झोन येथे नगर परिषद औसा यांच्याकडून पुरवण्यात आलेल्या सुविधा तसेच काॅरंटाईन सेंटर,सफाई कर्मचाऱ्यांसाठी व नागरिकांसाठी सुविधा तसेच सुरक्षा साहित्य- पी पी इ किट, सॅनिटायझर,मास्क, थर्मामीटर पल्स अॉक्सीमीटर इत्यादीवर दिनांक २० मार्च २०२०ते १५ संप्टेबर २०२०रोजी पर्यंत या कालावधीतील केलेल्या खर्चामध्ये अनियमितता दिसून येत आहे. या अनुषंगाने सदरील खर्चाची आपल्या स्तरावरुन योग्य ती चौकशी जिल्हाधिकारी लातूर यांनी करावी अशी मागणी जिल्ह्याधिकारी जी श्रीकांत यांना औसा तहसिलदार मार्फत एका निवेदनाद्वारे केलेली आहे यावेळी या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला औसा यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.