माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या मतदरसंघातील अंमलबजावणीचा शुभारंभ केला तसेच मोहिमेसंदर्भात मतदरसंघातील आशा कार्यकर्त्यांशी आॅनलाईन संवाद साधला!


आज तहसील कार्यालय, औसा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या मतदरसंघातील अंमलबजावणीचा शुभारंभ केला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्त्या व सुपरवायझर यांचा गौरव केला. मतदरसंघातील आशा कार्यकर्त्यांशी आॅनलाईन संवाद साधत या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी स्वतः काही गावांना भेटी देऊन मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती दिली.


यावेळी औसा तहसीलदार सौ शोभाताई पुजारी, गटविकास अधिकारी श्री सुर्यकांत भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख, पोलिस निरीक्षक श्री ठाकूर, अधिकारी कर्मचारी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होते!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या