जिल्हयातील सर्व अधिकारी वर्गाने कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत

              

जिल्हयातील सर्व अधिकारी वर्गाने

कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत

                                    -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 





*कोव्हिड केअर सेंटरला प्रत्येक दिवशी अधिकाऱ्यानी भेट दयावी

*तालुक्याच्या ठिकाणी 50 ऑक्सीजनेट  बेड उभारावेत

*होम आयसोल्यूशन झालेल्या व्यक्ती घराबाहेर फिरल्यास कारवाई 

लातूर,दि.8,(जिमाका)- जिल्हयात कोरोना (कोव्हिड-19) चा  प्रार्दुभाव वाढतच आहे.हा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हयातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्परात योग्य समनव्य ठेवून जिल्हयातून कोरोना हद्दपार  करण्यासाठी  प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित कोरोना (कोव्हिड-19) प्रार्दूभाव आढावा बैठकीत दिले. या बैठकीस मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानागरपालिका आयुक्त देवीदास टेंकाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लांडगे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोश जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, जिल्हा शल्यचिकित्स डॉ. संजय ढगे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे उपस्थित होते.

या बैठीस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जी.श्रीकांत म्हणाले की, जिल्हयात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढतच आहे यास घाबरुन न जाता सर्व संबंधित अधिकारी वर्गाने पूर्ण ताकतीने कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच जिल्हयात होम आयसोल्यूसेशन जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सूचित केले.महारनगपालिकेतील तीन ठिकाणी  तीन कोव्हिड केअर सेंटर आहेत त्या ठिकाणास मनपा आयुक्त यांनी प्रत्येक दिवशी भेट दयावी.  तसेच जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील कोव्हिड सेंटरला संबंधित तहसिलदार, बिडीओ,बिओ यांनी भेटी देऊन कोरोना प्रार्दूभाव टाळण्यासाठी योग्य ते प्रयत्न  करावे.

जिल्हयात बऱ्याच ठिकाणी होम आयसोल्यूशन झालेली व्यक्ती घराबाहेर फिरत असल्याचे निर्देशनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या विभागात प्रत्येक दिवशी बैठक घ्यावी व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी किमान 50 ऑक्सीजनेट बेड उभारावेत अशा सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या. 

जिल्हयात रॅपिड व अँन्टीजन टेस्टची कमतरता नाही. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे टेस्ट करणे नितांत  गरजेचे आहे. अनावश्यक टेस्ट करु नयेत. लक्षणे असतील तरच टेस्ट करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जिल्हयात उभारण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटर मध्ये स्वच्छता ठेवावी. कोव्हिड केअर सेंटर बाबत तक्रार आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सूचित केले. प्रत्येक तालुक्यातील कोरोना डाटा इंट्रीचे काम पेंडींग असल्याचे निर्देशनास आले आहे. या कामास प्राधान्य देऊन उपलब्ध्  मनुष्यबळावर डाटा इंट्रीचे काम ताबडतोबीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. 

प्रारंभी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी जिल्हास्तरीय कोरोना आढावा बैठकीचे प्रस्ताविक केले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी  सुनिल यादव, अविनाश कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय कुमार ढगे, सर्व तालुक्याचे तहसिलदार ,गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी,संबंधित अधिकारी उपस्थित होते. 


                                            ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या