मुस्लिम आरक्षणाची अमंलबजावणी करा - एम.एच.शेख
लातूर/प्रतिनिधी ः महाविकास आघाडी शासनाने मुस्लिम समाजास मा.सोनियाजी गांधी, राहूलजी गांधी यांच्या ध्येय धोरणानुसार सच्चर समीती, व स्व: विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र अल्पसंख्याक आयोग स्थापन करून शिष्यवृत्ती लागु केली व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिम आरक्षण 5% लागु केले होते पण भाजप-शिवसेना शासन आल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मुस्लिम आरक्षण चा मुद्दा जाणून बुजून ताडकळत ठेवला व काँग्रेस पक्षाच्या मनात नव्हते असा प्रचार केला व मुस्लिम आरक्षण रखडले पण सध्या शिवसेनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजहीत जोपासत समाज संघटना व राजकीय मुद्दे कधी व कसे उपस्थित करावयाचे याची जाणीव आहे.
तरी महाराष्ट्र राज्यात मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेतल्यास सुवर्ण अक्षरात महाविकास आघाडी शासनाचे कार्य मुस्लिम समाज कदापी विसरू शकणार नाही तरी कॉग्रेस पक्षासह शिवसेना,राष्ट्रवादी, पक्षाने मुस्लिम आरक्षण बाबतीत 150 ठिकाणा हुन लोकशाही व सनदशीर मार्गाने दिलेले निवेदने शासकीय नोंद नुसार स्विकारून मुस्लिम आरक्षण लागु करावे असे मत एम.एच.शेख सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.