हनुमान चौकात गटार तुंबल्याने २४ तास वाहातेय घाण पाणी. व्यापार्‍यांना आणि ग्राहकांना होतोय प्रचंड दुर्गंधीचा त्रास.

 हनुमान चौकात गटार तुंबल्याने २४ तास वाहातेय घाण पाणी. 

 

व्यापार्‍यांना आणि ग्राहकांना होतोय प्रचंड दुर्गंधीचा त्रास. 





 




*{ व्यंकटराव पनाळे, जिल्हा प्रतिनिधी }*

लातुर : दि. २२ - लातूर शहरातला नामांकित चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान चौकामध्ये बस स्टॅन्ड कडून  गंजगोलाई कडे जात असताना हनुमान चौकाच्या अलीकडे पन्नास ते शंभर फुटावर गटार तुंबल्यामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण झालेली आहे. बेबी डॉट कॉम दुकानच्या जवळपास हि गटार तुंबलेली आसुन बेबी डॉट कॉम, मोबाईल वर्ल्ड, खूबसूरत कलेक्शन, आणि भोज हॉटेल या सर्व दुकाना समोरून ही गटार वाहत आहे. रविराज टाँवर समोरून येऊन हे वाहाणारे घाण पाणी हनुमान चौकातून सुभाष चौकाकडे वाहत जात आहे. सध्या कोरोना महामारीची मोठी भीतीदायक परिस्थिती निर्माण झालेली असताना महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे हनुमान चौकातील गटार तुंबून ते अत्यंत  घाण असलेले गटारीचे पाणी मागील तीन दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरुन रस्त्यावर वाहत आहे. आणि या घाणीमुळे भयानक दुर्गंधी पसरलेली आहे. या गटारीच्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यापार्‍यांच्या मध्ये व नागरिकांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे ही दुर्गंधी बंद करतील का ? आणि नालीची दुरुस्ती करून घाण पाण्याची विल्हेवाट लावतील का ? असा प्रश्न लोकचर्चेत आहे. 


- *व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या