शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवावा आ.पवार यांची फडणवीस यांना विनंती... पिक नुकसानीच्या मदतीसाठी आ. अभिमन्यू पवार यांचा मॅरेथॉन दौरा..

 शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवावा आ.पवार यांची फडणवीस यांना विनंती... 





पिक नुकसानीच्या मदतीसाठी आ. अभिमन्यू पवार यांचा मॅरेथॉन दौरा.. 





औसा - पीक नुकसानीची पाहणी,आढावा बैठक, बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे पिक नुकसानीची मागणी व तातडीने मुंबईकडे रवाना होवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून अधिवेशनात मुद्दा मांडणीस विनंती असा मॅरेथॉन दौरा करीत लातूर जिल्ह्यासह पीकांचे आतोनात नुकसान झाले आहे.याबाब शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी याबाबत पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडून मदत द्यायला भाग पाडावे अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडून लातूर येथील मराठवाडा मेट्रो कोच कारखाना पाहणीचा वृत्तांत त्यांच्यासमोर मांडला आहे. 




औसा मतदारसंघातील गावात जावून खरिप हंगामातील सोयाबीन, उडीद व मूग या पीकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करित आ. अभिमन्यू पवार यांनी त्याच दिवशी औसा येथे आढावा बैठकीतून कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून पीक परिस्थितीचा संपुर्ण आढाव घेत याच दिवशी सोयाबीन नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे करून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तसेच पिकविमा नुकसानीच्या नियमानुसार २५ टक्के आगाऊ देणे बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी करीत तातडीने मुंबई गाठत महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. मतदरसंघातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केलेल्या पाहणीतून समोर आलेली विदारक परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील सोयाबीन उडीद व मूग या पीकांचे म्हणजे संपूर्ण खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झालं असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणं आवश्यक आहे. पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसांचे असल्याने माझ्यासारख्या नव्या आमदाराला बोलण्यासाठी वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे हा विषय सभागृहात मांडून सरकारला मदत द्यायला भाग पाडावे अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


               ३० आॅगस्ट रोजी लातूर येथील मराठवाडा मेट्रो कोच कारखाना,भेटीचा संपूर्ण वृत्तांत देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडला.दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या आगामी जयंतीपासून या कारखान्यातून प्रत्यक्ष निर्मिती सुरू करण्याच्या विनंतीला रेल्वेमंत्री  पियुष गोयल यांनी  तत्वता मान्यता दिल्याची माहितीही आ. अभिमन्यू पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या