औशाची बाजारपेठ दर रविवारी बंद: व्यापारी महासंघाचा निर्णय
औसा मुख्तार मणियार
औसा शहरासह तालुक्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांकडून सोशल डिस्टन्स नियमांचे म्हणावे तसे पालन होत नसल्याने आता समूह संसर्गामुळे कोरोना विषाणूंचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता दर रविवारी औसा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे.रविवारी औसा बाजारपेठ बंद करण्यात येत असल्याचे स्पीकरवरून व्यापारी व ग्राहकांना माहितीसाठी सांगण्यात आले आहे.कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जनतेनीच आता काळजी घेणे आवश्यक आहे. शासनामार्फत सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात असूनही औसा येथील कोव्हिड सेंटरमध्ये १०० बेडची सुविधा असून ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद जाधव यांनी सध्या औशाच्या कोव्हिड सेंटरमध्ये ९९ कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती सोशल मिडिया वरुन दिली आहे.शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता दर रविवारी औशाची बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याने सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार रविवारी बंद ठेवावेत, आणि व्यापारी व ग्राहकांनी या बाबींची नोंद घ्यावी,असे आवाहन औसा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.