शिक्षक दिनाचे औचित्य साधून
शिवछत्रपती विद्यालयात शिक्षकांचा सन्मानलातूर ,दि. ०६ :
लातूर येथील मोरे नगर, कन्हेरी रोड, परिसरातील श्री माऊली बहुउद्देशीय शैक्षणिक व सेवाभावी संस्था लातूर द्वारा संचलित *शिवछत्रपती विद्यालयांमध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू.... या शालेय प्रार्थनेने करण्यात आली. विद्येची देवता माता सरस्वती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष मिश्रा सहशिक्षिका सौ. दीपिका कपाळे, सहशिक्षक शिवकुमार आपशेट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपले विचार व्यक्त करतांना सुभाष मिश्रा यांनी ज्याला नेहमी ज्ञानाची तहान असते, तो शिक्षक असतो असे सांगितले. शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना नेहमी विज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करून घडविण्याचे कामही शिक्षक करतो, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी उपस्थित शिक्षक वृंदांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रती आपले विचार व्यक्त केले. विद्यालयाच्या वतीने शिक्षकांना पुस्तक, लेखणी व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षिका सौ. अर्चना मोरे यांनी तर आभार प्रदर्शन शिवकुमार अपशेट्टे यांनी केले.
--------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.