रस्त्याच्या कामांमुळे नाली खोदल्याने शेतकरी अडचणीत
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील गुळखेडा येथील रस्त्याचे काम हे ऐन पावसाळ्यात पावसाळ्यात सुरू करून रस्त्याच्या दोन्ही साईडला मोठ्या नाला खोदल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत .येल्लोरी ते बिरवली जाणाऱ्या गुळखेडा मार्गे रस्त्याचे कंत्राटदाराने काम सुरू केले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठी नाली खोदण्यात आली आहे 3-4 फूट खोलीची नाली रस्त्याच्या लगतच खोदल्यामुळे गुळखेडा शिवाराती शेतकऱ्यांना शेतात बैल बारदाना घेऊन जाण्यासाठी व रस्त्यावरून शेतात पायी जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सध्या सुगी व सराईचे दिवस असून सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतात शेतकरी शेतमजुरांना जाता येत नाही.बैल व जनावरे नेता येत नाहीत. अनेक शेतकऱ्यांना शेतात कापणी यंत्र ट्रॅक्टर बैलगाडी, मोटारसायकल सुध्दा नेता येत नसल्याने गुळखेडा शिवारातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. येल्लोरी ते बिरवली गुळखेडा मार्गे जाणाऱ्या लगतच्या शेतकऱ्यांची रस्त्याची कामे ऐन पावसाळ्यात सुरू झाल्याने गैरसोय झाली आहे. संबंधित कंत्राटदाराने शेतकऱ्यांना जागोजागी जाण्या-येण्यासाठी रस्ता ठेवला नसल्याने गुळखेडा येथील शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांची ऐन शिजन मध्ये गैरसोय करण्यासाठी रस्त्याचे काम सुरू
प्रत्येक सर्वे नं मध्ये सहा सात शेतकरी असून ते सर्वजण सर्वेनं बांधावरून ये-जा करतात.शेतात ट्रक्टर व अनेक साधने शेतात घेऊन जाण्यासाठी सर्वे नं बांधावरून जातात. तसेच अनेक शेतकरी यांच्या उड्डाण वाटणी आहेत. तेही शेतकरी सर्वेनं वरून आपल्या शेतात जातात.पण संबंधित रस्ता गुत्तेदार यांने सर्वे नं मधील सर्व शेतकऱ्यांची नाली खोदून गैरसोय केली आहे. सर्व शेतकऱ्यांनी संबंधित कामावर हजर असणाऱ्या इंजिनिअर यांना विनंती केली की आमच्या सर्वेनं बांधणारा वर तुम्ही एक सिमेंटच्या नळी टाकून द्या जेणेकरून सध्या आम्हांला शेतात जाण्यासाठी व बैल बारदाना घेवून जाण्यासाठी गैरसोय होणार नाही.पण संबंधित कामावर हजर असणाऱ्या इंजिनिअर यांनी तसे करता येत नाही. रोड असेल तर नळी टाकून देतो असे सांगितले. पण सर्वे नं वरील बांधावरून त्या सर्वे नं मधील शेतकरी यांना शेतात कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला असून रस्त्याच्या गुत्तेदार यांनी प्रत्येक सर्वे नं ला शेतात जाण्यासाठी वाट करून द्यावी अशी मागणी गुळखेडा शिवारातील शेतकरी करत आहेत. तसे केले नाही तर सर्व शेतकरी मिळून तहसीलदार यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे आमच्या प्रतिनीधी शी बोलताना सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.