माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर चौकाच्या नामफलकाचे अनावरण.
निलंगा:- शहरालगत असलेल्या दापका ग्रामपंचायतीच्या वतीने दुर्गा नगर व तेरणा कॉलनी येथील मुख्य चौकाचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर चौक असे नामकरण करून या चौकाच्या नामफलकाचे अनावरण रविवार दिनांक 13-9-2020 रोजी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष लाला पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
निलंगा तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरालगत असलेल्या दापका ग्रामपंचायत हद्दीतील नागरी परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या भागाचा मोठ्या प्रमाणात कायापलट झाला असून या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाले आहेत. त्यांच्या कार्याची या भागातील नागरिकांना सदैव आठवण रहावी व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी म्हणून दापका ग्रामपंचायतीने निलंगा दापका मुख्य रस्त्यावरील दुर्गा नगर, तेरणा कॉलनी व बसवेश्वर नगर येथील मुख्य चौकास माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते घेतला आहे. त्यानुसार आज रविवार रोजी निलंगा दापका मुख्य रस्त्यावरील दुर्गा नगर तेरणा कॉलनी येथील मुख्य चौकात डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर चौकाच्या नामफलकाचे अनावरण काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष लाला पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री लाला पटेल (तालुका अध्यक्ष काॅग्रेस निलंगा), श्री प्रज्ञासागर वाघमारे (सरपंच दापका), श्री अंकुश भोपी (ग्रा प सदस्य दापका),श्री गोपाळ महाराज गायकवाड (ग्रा प सदस्य दापका) ,श्री बबर पठाण (अध्यक्ष तंटामुक्ती दापका), श्री चंबुले साहेब,श्री सुहास देशमुख, श्री शकिल पटेल (माजी सरपंच),श्री संजय कांबळे (ग्रा प सदस्य दापका),श्री अलिम शेख,श्री नांगरे भिमराव,श्री देविदास घोडके,श्री संतोश एखंडे,श्री अॅड. किरण घाडगे, श्री सचिन घाडगे,श्री महालिंगअप्पा लाटे,श्री भागवत गायकवाड,श्री प्रमोद कुलकणी, श्री सुधाकर जाधव,श्री संतोश सांळुके, श्री बाबन मुबारक, श्री बबलु जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.